Pune News : थर्टीफस्टच्या दिवशी वाद झाला अन् झोपेत असलेल्या बायकोच्या चेहऱ्यावर पतीने उकळता चहा फेकला, पुण्यातील घटना
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकल्याची घटना कोथरूड भागात घडली आहे.
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नीच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकल्याची घटना कोथरूड भागात घडली आहे. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
नेमकं काय घडलं?
23 वर्षीय तरुणी आणि आरोपी 27 वर्षीय पती पुण्यातील पौड रस्त्यावरील भागात राहतात. वर्षभरापूर्वी यांचे लग्न झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. बुधवारी (31 डिसेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास तक्रारदार तरुणी झोपली असताना, पतीसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादातून पतीने तिच्या चेहऱ्यावर उकळता चहा फेकला. या घटनेत तरुणीच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे.
advertisement
यामुळे 23 वर्षीय तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात पतीविरोधात फिर्याद दिली आहे. आरोपी 27 वर्षीय पती खासगी ठिकाणी नोकरी करतो. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार एम. जी. दळवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
advertisement
दुसऱ्या एका घटनेत, पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका महिलेला बेदम मारहाण करून तिच्या चेहऱ्यावर ॲसिडसदृश द्रवपदार्थ ओतण्यात आला. ही घटना एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात घडली असून, उत्तमनगर पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 01, 2026 4:26 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Pune News : थर्टीफस्टच्या दिवशी वाद झाला अन् झोपेत असलेल्या बायकोच्या चेहऱ्यावर पतीने उकळता चहा फेकला, पुण्यातील घटना










