शिरूरच्या राजकारणात ट्विस्ट, प्रकाश धारिवाल यांच्या आघाडीची नगर परिषद निवडणुकीतून माघार!

Last Updated:

गेल्या अनेक वर्षापासून शिरूर नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता असल्याने यंदाच्या निवडणुकीत आघाडीची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

प्रकाश धारीवाल
प्रकाश धारीवाल
सचिन तोडकर, प्रतिनिधी, शिरूर: पुणे जिल्ह्याच्या शिरूर नगरपरिषद निवडणुकीतून उद्योजक आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धारिवाल यांच्या शिरूर शहर विकास आघाडीने माघार घेतली असून यावेळची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय
मला राजकारणात नाही तर समाजकारणात रस असून यंदाच्या निवडणुकीत शिरूर शहर विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा आघाडीचे सर्वेसर्वा उद्योगपती आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धरिवाल यांनी केलीय.
शिरूर नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून गेल्या अनेक वर्षापासून शिरूर नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता असल्याने यंदाच्या निवडणुकीत आघाडीची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र प्रकाश धारिवाल यांनी आता शिरूर शहर विकास आघाडी ही निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. धारिवाल यांच्या शिरूर शहरातील आशीर्वाद या निवासस्थानी त्यांनी कार्यकर्त्यासमोर भूमिका मांडली.
advertisement

शिरूरचे पक्षीय बलाबल काय?

शिरूर नगरपालिकेत शहर विकास आघाडीचे १७ नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे २ नगरसेवक तर लोकशाही क्रांती आघाडी आणि अपक्ष प्रत्येकी १ असे एकूण २१ नगरसेवक आहेत. भाजपने ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा देत मागील निवडणुकीत दोन जागा जिंकत आपले अस्तित्व दाखवून दिले. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या निधनानंतर शहरात सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे.
advertisement

शिरूर नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव

शिरूर नगराध्यक्षपद यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून या पदासाठी अनेक महिला नेत्या इच्छुक आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिरूरच्या राजकारणात ट्विस्ट, प्रकाश धारिवाल यांच्या आघाडीची नगर परिषद निवडणुकीतून माघार!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement