Navratri 2025: अंबाबाईच्या प्रसादाची होणार तपासणी! देवस्थान समितीने सांगितलं कारण

Last Updated:

Navratri 2025: कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात विशेष गर्दी होते.

Navratri 2025: अंबाबाईच्या प्रसादाची होणार तपासणी! देवस्थान समितीने सांगितलं कारण
Navratri 2025: अंबाबाईच्या प्रसादाची होणार तपासणी! देवस्थान समितीने सांगितलं कारण
कोल्हापूर: सोमवारपासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त कोल्हापुरात जय्यत तयारी सुरू आहे. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात विशेष गर्दी होते. राज्यातील आणि परराज्यातील लाखो भाविक देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी करवीरनगरीत येतात. आर्थिक लाभासाठी काही दुकानदार विविध मार्गांनी भक्तांची फसवणूक करत असल्याचे प्रकार घडतात. ही बाब लक्षात घेऊन यावर्षी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सवानिमित्त मंदिर कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची बैठक घेतली. अंबाबाई मंदिर आवारातील व बाह्य परिसरातील दुकानांमध्ये कालबाह्य झालेले लाडू आणि पेढ्यासारखे प्रसादाचे पदार्थ ठेवू नयेत, या पदार्थांची अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी केली जाईल, अशा सूचना नाईकवाडे यांनी दिल्या. जोतिबा यात्रेवेळी डोंगरावर कालबाह्य झालेला प्रसाद आढळला होता. त्यामुळे अंबाबाईच्या नवरात्रौत्सवात याबाबत दक्षता घेतली जाणार आहे.
advertisement
अनेकदा मंदिराच्या आवारातील दुकानदार भाविकांनी ओटीचं अर्धवट साहित्य देतात. भाविकांनी याबाबत तक्रारी देखील केल्या आहेत. याबाबत देखील शिवराज नाईकवाडे यांनी दुकानदारांना सुचना दिल्या. "भाविकांनी खरेदी केलेल्या साड्या, ओटी पूर्ण असाव्यात, साड्या अर्ध्या कापून त्यात पेपर भरलेल्या नसाव्यात, प्लॅस्टिक पिशव्या वापरू नयेत. याबाबत भाविकांकडून तक्रारी येणार नाहीत, याची काळजी घ्यावी," असं नाईकवाडे म्हणाले.
advertisement
अंबाबाई मंदिराच्या आवारात सुमारे 35 दुकानं आहेत. दुकानदारांनी ओवरीच्या बाहेर 5 फूट अतिक्रमण केले आहे. ते हटवावे, भाविकांना आवारात ये-जा करताना अडथळा होऊ नये, याची काळजी घ्यावी, असंही सांगण्यात आलं. याशिवाय, देवस्थान समितीचे कर्मचारी तसेच सुरक्षा रक्षकांची बैठक घेऊन त्यांना भाविकांशी सौजन्याने वागण्याच्या सूचना करण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांनी दर्शन व्यवस्थेबद्दल भाविकांना माहिती द्यावी आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क रहावे, असं सांगण्यात आलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: अंबाबाईच्या प्रसादाची होणार तपासणी! देवस्थान समितीने सांगितलं कारण
Next Article
advertisement
BMC Election : महापालिका निवडणुकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समोर आली मोठी अपडेट
महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो
  • महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो

  • महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो

  • महापालिकांचे काउंटडाऊन सुरू, बिगुल कधी वाजणार, मतदानाच्या तारखेबाबत समो

View All
advertisement