advertisement

Navratri 2025: घटस्थापनेसाठी लागणाऱ्या बांबूच्या टोपल्यांची मागणी घटली, कल्याणमधील विक्रेत्यानं सांगितलं कारण

Last Updated:

Navratri 2025: नवरात्रौत्सवात घटस्थापनेसाठी बांबूपासून तयार केलेल्या टोपल्यांचा वापर केला जातो.

Navratri 2025: घटस्थापनेसाठी लागणाऱ्या बांबूच्या टोपल्यांची मागणी घटली, कल्याणमधील विक्रेत्यानं सांगितलं कारण
Navratri 2025: घटस्थापनेसाठी लागणाऱ्या बांबूच्या टोपल्यांची मागणी घटली, कल्याणमधील विक्रेत्यानं सांगितलं कारण
कल्याण: आज (21 सप्टेंबर) पितृपक्षाची समाप्ती होत असून उद्यापासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. पुढील 9 दिवस सर्वत्र देवीच्या विविध रुपांची पूजा केली जाईल. नवरात्रीमध्ये घटस्थापनेला फार महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये घटस्थापना केली जाते. मात्र, यंदा वाढलेल्या महागाईचा घटस्थापनेवर देखील परिणाम दिसत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या सुरुवातीला घटस्थापनेसाठी लागणाऱ्या लाकडी बांबूच्या टोपल्यांना खूप मागणी असली. यंदा झालेल्या सततच्या पावसामुळे टोपल्यांना बुरशी लागली आहे. त्यामुळे, ग्राहक टोपल्या खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याऐवजी प्लॅस्टिकच्या टोपल्यांना प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे विक्रेत्यांपुढे मोठं संकट उभं राहिलं आहे.
advertisement
नवरात्रौत्सवात घटस्थापनेसाठी वर्षानुवर्षे बांबूपासून तयार केलेल्या टोपल्यांचा वापर केला जातो. घटस्थापनेच्या दिवशी बांबूच्या टोपलीत माती भरून त्यात गहू, तांदूळ, मूग यांसारखं पाच प्रकारचं धान्य पेरण्याची परंपरा आहे. नऊ दिवसांच्या कालावधीत याला अंकुर फुटतात. त्यामुळे नवरात्रौत्सवात बांबूच्या टोपल्यांना मागणी असते. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी दरवर्षी कल्याणमध्ये मनमाड, नाशिक आणि मुंबई येथून टोपल्या विक्रीसाठी आणल्या जातात.
advertisement
टोपली विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोपल्यांच्या दरात 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 18 रुपयांना विकली जाणारी टोपली यंदा 32 रुपयांपर्यंत विकली जात आहे. सर्वांत मोठी टोपली 400 रुपयांना विकली जात आहे. याशिवाय, नवरात्रीत महत्त्वाचा मानला जाणार गरबा (मातीचं सजवलेलं मडकं) देखील महागला आहे. एक गरबा 200 ते 350 रुपयांना विकला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: घटस्थापनेसाठी लागणाऱ्या बांबूच्या टोपल्यांची मागणी घटली, कल्याणमधील विक्रेत्यानं सांगितलं कारण
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement