कुठेही घडलं नाही ते पुण्यात घडलं, प्रभाग क्रमांक ४० मध्येच ऐतिहासिक समीकरण, पुणेकरांचा नादखुळा!

Last Updated:

विशेष म्हणजे राज्यभरातून पुण्यातला हा केवळ एकच प्रभाग होता जिथे सर्व महिला उमेदवार होत्या.

पुणे महानगरपालिका
पुणे महानगरपालिका
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना पुण्यातील प्रभाग क्रमांक ४० ने संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण, राज्यभरात कुठेही न घडलेलं ऐतिहासिक समीकरण केवळ पुण्यातल्या याच प्रभागात पाहायला मिळालं. या प्रभागातून भाजपने चारही जागांवर केवळ महिला उमेदवारांना संधी दिली आणि विशेष म्हणजे या चारही महिला उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला.
२९ महानगरपालिका निवडणुकांमध्ये पुण्यातील प्रभाग क्रमांक ४० हा राज्यभरातील एकमेव प्रभाग ठरला, जिथे सर्व उमेदवार महिला होत्या. विशेष बाब म्हणजे सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातील जागेसाठीही भाजपने महिला उमेदवाराला उमेदवारी दिली होती. भाजपच्या या धाडसी निर्णयावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, मात्र निकालाने पक्षाचा निर्णय योग्य ठरवला आहे.
प्रभाग क्रमांक ४० मधून अर्चना अमित जगताप, वृषाली सुनील कामठे, पूजा तुषार कदम आणि रंजना पुंडलिक टिळेकर या चारही महिला उमेदवारांनी विजय मिळवत महिलाराज अधोरेखित केले. प्रचाराच्या काळात या चारही उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला, स्थानिक प्रश्न मांडले आणि विकास करण्याचा विश्वास मतदारांना दिला.
advertisement
राज्यात आणि देशात नव्याने महिला आरक्षणाची चर्चा सुरू असताना पुण्यातील या निकालाची सर्वत्र चर्चा आहे. महिला केवळ आरक्षित जागांपुरत्याच मर्यादित नसून सर्वसाधारण प्रवर्गातही त्या सक्षमपणे निवडणूक जिंकू शकतात, हे या निकालाने अधोरेखित केले आहे. विशेष म्हणजे पुण्यात भारतीय जनता पक्षाने पुरूषांच्या तुलनेत महिलांना अधिक उमेदवारी दिली होती. भाजपचा हा प्रयोग यशस्वी ठरल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.
advertisement
दरम्यान, हा विजय केवळ आमचा नसून प्रभागातील प्रत्येक महिलेचा आहे. विकास, सुरक्षितता आणि पारदर्शक कारभार हाच आमचा अजेंडा असेल, अशा भावना विजयी उमेदवारांनी व्यक्त केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुठेही घडलं नाही ते पुण्यात घडलं, प्रभाग क्रमांक ४० मध्येच ऐतिहासिक समीकरण, पुणेकरांचा नादखुळा!
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement