advertisement

प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी, पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या सर्व ST बसेस रद्द, कोणकोणत्या फेऱ्या रद्द?

Last Updated:

Pune Mumbai Road Traffic New Update: पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातामुळे मागील २२ तासांपासून वाहतूक कोंडी आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कोंडी, सर्व एसटी बसेस रद्द
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कोंडी, सर्व एसटी बसेस रद्द
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 18 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर ऊलटून सुमारे २१ तास झाले असले, तरी अद्याप वाहतूक सुरळीत झालेली नाही. या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, हजारो प्रवासी तासनतास रस्त्यावर अडकून पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाने पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एस टी बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक कोंडी अजूनही कायम असल्याने एसटी प्रशासनाने निर्णय घेतल्याचे सांगितले.
मागील २१ तासांपासून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हालअन्न पाण्याविना हाल होत असून प्रवासी अनेकजण मेटाकुटीला आले आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेत वाहनांमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना एक घोट पाण्यासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. असे असताना पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
advertisement

कोणकोणत्या फेऱ्या रद्द?

मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवलीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुढील काही तासासाठी बसेस फेऱ्या बंद राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिलेल्या आहेत. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल, असे एसटी प्रशासनाने सांगितले.

अपघाताच्या २२ तासानंतरही वाहनांच्या रांगा ५० किमीपर्यंत

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने मोठी गळती सुरू होती. काल दुपारी चार, साडे चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तेव्हापासून द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी व्हायला सुरुवात झाली. अपघाताच्या २२ तासानंतरही वाहनांच्या रांगा ५० किमीपर्यंत आहेत.
advertisement

वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू

दरम्यान, प्रशासनाकडून गॅस टँकर हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, कामाला विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे या कठीण परिस्थितीत स्थानिक सेवाभावी संस्था तसेच धर्मापाल तंतरपाळे यांनी पुढाकार घेत हजारो पाण्याच्या बाटल्या प्रवाशांना वितरित केल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला असून, काही प्रमाणात तरी आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी, पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या सर्व ST बसेस रद्द, कोणकोणत्या फेऱ्या रद्द?
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement