PCB ची नौटंकी संपणार! India vs Pakistan सामना होणार, दिग्गज खेळाडूने स्पष्टच सांगून टाकलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तानच्या अशा निर्णयाने त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता असल्याचे कदाचित बोर्ड निर्णय मागे घेण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे असे जर झाल्यास 15 फ्रेब्रुवारीला नियोजित पार पडणार भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे.
India vs Pakistan : बांग्लादेशची वर्ल्ड कपमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या समर्थनासाठी भारताविरूद्ध श्रीलंकेच्या कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडिअमवर पार पडणाऱ्या सामन्यावर बहिष्कार टाकला होता.विशेष म्हणजे पाकिस्तानने याबाबत आयसीसीला अधिकृतरीत्या कळवले नाही आहे. त्यात पाकिस्तानच्या अशा निर्णयाने त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागण्याची शक्यता असल्याचे कदाचित बोर्ड निर्णय मागे घेण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे असे जर झाल्यास 15 फ्रेब्रुवारीला नियोजित पार पडणार भारत पाकिस्तान सामना होण्याची शक्यता आहे,असा विश्वास भारताच्या एका दिग्गज खेळाडूने व्यक्त केला आहे.
पाकिस्तानच्या या बहिष्काराच्या भूमिकेनंतर आयसीसीचं आणि पाकिस्तानच मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आयसीसी पाकिस्तानवर दंडासोबत मोठी कारवाई करण्याच्या विचारात आहे.कारण आयसीसी स्पर्धेत ज्या ज्या भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने सामने येतात. त्या त्या वेळी आयसीसीला जवळपास 250 मिलियन डॉलर म्हणजेच (2200 करोड हून अधिक) महसूल मिळतो.
काही मिडीयी रिपोर्टमध्ये हा महसूल 3000 करोड हून अधिक होत असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत जर हा सामना पार पडला नाही. तर प्रायोजकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.पाकिस्तानची वर्षभराची कमाई जवळपास 35-45 डॉलर म्हणजेच 300 ते 400 करोड.यामध्ये आयसीसीकडून मिळणार उत्पन्न, पीएसएलची कमाई, सामन्यांचे तिकीटांची कमाई असं सगळंच आलं.त्यामुळे पाकिस्तानला भरपाई द्यायची झाली तर 7 वर्ष लागणार आहे.त्यामुळे हे आर्थिक संकट पाकिस्तान झेलू शकत आणि त्यांच्याकडे माघार घेण्याशिवाय पर्याय नाही.
advertisement
दरम्यान या वादात टीम इंडियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज आर.अश्विनने भारत पाकिस्तान सामने होतील,असा विश्वास व्यक्त केला आहे. ''100 टक्के, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होईल. मला वाटते की ते होईल. पुढील 3-4 दिवसांत हा निर्णय मागे घेण्यात येईल,हा माझा अंदाज आहे,असे आर अश्विन त्याच्या 'अॅश की बात' या त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला आहे. तसेच मला भारत-पाकिस्तान सामना पहायचा आहे कारण त्यात व्यावसायिक निर्णय गुंतलेले आहेत,असे देखील अश्विनने सांगितले आहे.
advertisement
दरम्यान आता अश्विनला जो विश्वास वाटतो आहे, तो खरंच खरा ठरतो का? हे येत्या काही दिवसात कळणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 4:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PCB ची नौटंकी संपणार! India vs Pakistan सामना होणार, दिग्गज खेळाडूने स्पष्टच सांगून टाकलं










