advertisement

भारत 8-10 टक्के वेगाने वाढू शकतो, दुप्पट आकड्याची वाढही शक्य: मुकेश अंबानी

Last Updated:

"मला भारत जगापेक्षा वेगाने पुढे जाताना दिसतो. भारतीय अर्थव्यवस्थेचं झाड आता स्पष्टपणे फळ देत आहे, तेही स्थिरता आणि भरपूर शक्यतांसह"

News18
News18
मुंबई:  "भारत हा 8 ते 10 टक्के वाढ दर कायम ठेवू शकतो आणि टिकाऊपणे दुप्पट आकड्याची वाढही मिळवू शकतो" असं म्हणत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी भारताच्या दीर्घकालीन आर्थिक शक्यतांबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबईत जिओ-ब्लॅकरॉक इव्हेंटमध्ये ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांच्याशी संवाद मुकेश अंबानी यांनी संवाद साधला. यावेळी ते  म्हणाले की,"मला भारत जगापेक्षा वेगाने पुढे जाताना दिसतो. भारतीय अर्थव्यवस्थेचं झाड आता स्पष्टपणे फळ देत आहे, तेही स्थिरता आणि भरपूर शक्यतांसह. आमच्या धोरणांमध्ये सातत्य आहे आणि आम्ही नेहमीच जपून पावलं टाकली आहेत. भारतीयांची बचत उत्पादक नव्हती' असं यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.
advertisement
तसंच, "गेल्या 5-6 दशकांपासून भारतीय सतत बचत करत आहेत, पण ती बचत तितकी उत्पादक नव्हती. जिओ-ब्लॅकरॉकसाठी संधी अशी आहे की, आपण लोकांना बचतीसोबत ती कमाईत बदलण्याचा पर्याय द्यावा' असंही अंबानी यांनी सांगितलं.
ऊर्जा आणि तंत्रज्ञानात आत्मनिर्भरता
ऊर्जा क्षेत्राबद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणाले की, "पुढील दशकात भारत आपली 80 टक्के ऊर्जा आयात करणार नाही. तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांमध्ये भारत जगापेक्षा मागे राहणार नाही. माझा विश्वास आहे की, भारताकडे 4.5 ट्रिलियन डॉलरची संधी आहे आणि पुढील 20-30 वर्षांत भारत जगातील इतर देशांपेक्षा वेगाने पुढे जाईल' असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.
advertisement
समाजासोबत गुंतवणूकदारांचाही फायदा
जिओ-ब्लॅकरॉक, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जगातील सर्वात मोठी एसेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅकरॉक यांच्यात 50:50 संयुक्त भागीदारी आहे. या भागीदारीबद्दल अंबानी म्हणाले की, "लॅरी यांनी मला सांगितलं की ब्लॅकरॉकचा उद्देश फक्त तात्पुरते परिणाम किंवा गुंतवणूकदारांसाठी परतावा मिळवणे नाही. जर आपण आधी समाजाच्या चांगल्या भविष्यासाठी या पैशाचा वापर केला नाही, तर आपले काम अपूर्ण आहे. हीच विचारधारा रिलायन्सचीही आहे"
advertisement
(डिस्क्लेमर- नेटवर्क18 आणि टीव्ही18 कंपन्या चॅनल/वेबसाइट चालवतात, ज्यांचे नियंत्रण इंडिपेंडेंट मीडिया ट्रस्टकडे आहे, ज्यात रिलायन्स इंडस्ट्रीज एकमेव लाभार्थी आहे.)
view comments
मराठी बातम्या/मनी/
भारत 8-10 टक्के वेगाने वाढू शकतो, दुप्पट आकड्याची वाढही शक्य: मुकेश अंबानी
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement