गणेश काळे हत्या प्रकरण, आठ तासांत पुणे पोलिसांकडून चौघांना अटक, खेड शिवापूरच्या दर्ग्याजवळून उचलले

Last Updated:

Ganesh Kale Murder Case: शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गणेश काळे याची भर चौकात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रिक्षातून चालेल्या गणेशवर गोळ्यांचे ४ राऊंड फायर करण्यात आले.

गणेश काळे हत्या प्रकरण
गणेश काळे हत्या प्रकरण
पुणे : कोंढव्यातील खडी मशीन चौकात झालेल्या गणेश काळे हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार आरोपींना अटक केली आहे. खेड शिवापूर येथील दर्ग्यापासून पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गणेश काळे याची भर चौकात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रिक्षातून चालेल्या गणेशवर गोळ्यांचे ४ राऊंड फायर करण्यात आले. तो गतप्राण झाल्यानंतरही त्याच्यावर कोयत्याने वार केले गेले. दोन दुचाकींवरून एकूण चार आले होते. गणेश काळे हा रिक्षातून प्रवास करीत होता. खडी मशीन चौकात आरोपींनी त्याच्यावर एकूण चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या गणेशला लागल्या. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला संपवले. काही क्षणात आरोपी घटनास्थळावरून पसार होते.
advertisement

खेड शिवापूर इथल्या दर्ग्यापासून चौघांना ताब्यात घेतले

पुणे पोलिसांची दहा पथके आरोपींच्या मागावर होती. शनिवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुणे पोलिसांनी चारही आरोपींना खेड शिवापूर इथल्या दर्ग्यापासून ताब्यात घेतले. अमन मेहबूब शेख , अरबाज अहमद पटेल आणि २ अल्पवयीन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल आणि इतर हत्यारे पुणे पोलिसांनी जप्त केली.
advertisement

मृत गणेश काळे कोण? त्याचा गुन्हेगारी इतिहास काय?

मयत गणेश काळे हा गायकवाड टोळीतील नंबरकारी समीर काळे याचा भाऊ आहे. वनराज आंदेकर याला मारण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरविल्याचा समीर काळे याच्यावर आरोप आहे. सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षी वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून, कोयत्याने वार करत हत्या केली होती. वनराज याच्या खुनात वापरलेली पिस्तूल समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. समीर काळे हा सध्या येरवाडा तुरुंगात आहे.
advertisement
गणेश काळे हा रिक्षा चालक आहे. रिक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. तो येवलेवाडी परिसरात राहायला आहे. गणेश काळे याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा देखील दाखल आहे.

गणेशचा खून टोळीयुद्धाचा भाग आहे का?

पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोळीयुद्धातून हत्या झाल्याचा निष्कर्ष काढणे हे घाईचे ठरेल. मात्र हा खून टोळीयुद्धाचा भाग आहे का, याचा तपास सुरू आहे. आरोपींना शोधण्यासाठी १० पथके रवाना केली आहेत. फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गणेश काळे हत्या प्रकरण, आठ तासांत पुणे पोलिसांकडून चौघांना अटक, खेड शिवापूरच्या दर्ग्याजवळून उचलले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement