advertisement

क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरून वाद, शिरूरच्या मांडवगणमध्ये गोळीबाराचा थरार

Last Updated:

समझोत्याच्या बैठकीदरम्यान वाद चिघळून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला.

शिरूर पोलीस स्टेशन
शिरूर पोलीस स्टेशन
सचिन तोडकर, प्रतिनिधी, शिरूर (पुणे) : तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेतील बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांमध्ये संघर्ष होऊन गोळीबाराची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही बाजूंनी फायरिंग झाल्याचे समोर आले आहे.
समझोत्याच्या बैठकीदरम्यान वाद चिघळून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. एका बाजूने अक्षय गोविंदा पाटील (रा. तळेगाव ढमदेरे), पप्पु कड तर दुसऱ्या बाजूने अमोल आनंदा चौगुले (रा. मांडवगण फराटा), संदीप गिरी, राहुल गिरे यांच्यावर फायरिंगचे आरोप आहेत.
या घटनेत अक्षय पाटील जखमी झाला आहे. प्रकरणी मिनीनाथ गव्हाणे, अमोल चौगुले आणि राहुल गिरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
क्रिकेट स्पर्धेच्या बॅनरवरून वाद, शिरूरच्या मांडवगणमध्ये गोळीबाराचा थरार
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement