advertisement

Panjabrao Dakh: 'फॉर्च्युनर घेऊन हवामानाचा अंदाज वर्तवणारा पंजाबराव डख खोटारडा माणूस, बंदी घाला, गुन्हे दाखल करा' शेतकरी कडाडले

Last Updated:

इथून पुढे खोटा अंदाज वर्तवला तर बागयदाराचा काय हिस्का असतो दाखवून देऊ, चॅलेंज देऊनच बघा, नाही हिस्सा दाखवला, तर सुट्टी देणार नाही. आम्ही मागे सरणार नाही.

News18
News18
पंढरपूर: जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला कोण कसं फसवेल याचा नेम नाही. एकीकडे बोगस बियाणांचा सुळसुळाट तर दुसरीकडे वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी पुरता हवालदील झाला आहे. अशातच मोठा पाऊस होणार, गारपीट होणार, असा हवामानाचा अंदाज वर्तवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या बुवाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच शेतकरी आता अशा बुवाबाज हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरले आहे. पंजाबराव डख आणि बांगर यांच्याविरोधात पंढपुरातील द्राक्ष बागतदारांनी आंदोलन केलं आहे. या बोगस हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा, अशी मागणीच केली आहे.
हल्ली  सोशल मीडियावर हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्यांचा सुळसुळाट सुटला आहे. त्यामुळे पहिल्यांदाच शेतकऱ्यांनी स्वयंघोषित  हवामान तज्ज्ञांच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन केलं आहे.  पंढरपुरातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून आज बुधवारी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. 'कुठल्याही प्रकारची शासन मान्यता नसणारे अनेक हवामान तज्ञ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारे अंदाज वर्तवत आहेत. त्यामध्ये पंजाबराव डख, बांगर अशा अनेक हवामान तज्ञांवर बंदी घालावी' अशी थेट मागणी  द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.  तसंच, अशा बोगस हवामान तज्ञान विरोधात शेतकऱ्यांकडून यावेळी तहसील कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देऊन हवामान तज्ञांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली.
advertisement
'खोटे अंदाज देऊन द्राक्षाचा भाव पाडला'
यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेशाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी पंजाबराव डख यांच्यावर जोरदार टीका केली आहे."आम्ही आज पंढपूर तहसीलदार कार्यालयामध्ये जवळ ३०० ते ४०० शेतकरी आणि बागयदार खोट्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात तक्रार देण्यासाठी इथं आलो आहोत. गेली ५ वर्ष झाली, कोरोनामुळे इतकं नुकसान झालं नाही जितकं नुकसान या खोट्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या लोकांमुळे झालं आहे. ऐन हंगामाच्या काळात दर पाडायचे, हा उद्योग सुरू आहे. जी हवामानाचा अंदाज वर्तवणारी माणसं आहे, ती काही अधिकृत शासनाच्या यंत्रणेचा काही परवाना मिळाला आहे. सोशल मीडियावर वाटेल तरे भाकीत वर्तवून आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा अधिकार कुणी दिला. द्राक्षाचा भाव मागील ५ वर्षात शंभर ते सव्वाशे भाव मिळत होता आणि या खोट्या हवामान अंदाजकांनी गारपीट होईल, नदीनाले, ओढे भरून वाहतील, १५, १६ तारखेला मोठा पाऊस होईल, असं सांगून युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ टाकला. आता या युट्यूब चॅनेलवर व्हिज मिळवून पैसे त्याने कमावले, आणि इथं शेतकऱ्यांना द्राक्षाचा भाव १०,१२ दिवसांमध्ये ५० रुपये किलो मिळाला. आता या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे' असा आरोपच मारुती चव्हाण यांनी केला.
advertisement
'तुमच्या हवामानाची गरज नाही'
"दुसरं तुम्ही दिलेल्या तारखेला पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याबद्दल अंदाज वर्तवणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.  इतका मोठा पाऊस होणार, ओढे नाले वाहणार असं सांगितलं शासकीय यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापनाला त्रास दिला. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे.  त्या शिवाय ही लोक खोटा हवामान अंदाज वर्तवतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. या लोकांना आमचा इशारा आहे, तुमच्या हवामानाच्या अंदाजाची आम्हाला गरज नाही, आमच्या हातात अँड्राईड मोबाईल आहे, आमची पोरं शिकलेली आहे, शेतकरी शिकलेला आहे, अडाणी नाही, लोकांना गावाचा बांधावरच हवामान कळतो,  असा टोलाही चव्हाणांनी लगावला.
advertisement
'फॉर्च्युनर गाड्या घेतात, पैसे कुठून येतात, बँक खात्याची चौकशी करा'
'त्यामुळे तुम्ही कुणाकडून पैसे घेऊन, गहू हरभार आणि कापूस विकून फॉर्च्युनर गाड्या घेतल्या. इथं आम्ही द्राक्ष बागा उभारल्या पण अजून आम्हाला गाड्या मिळेना. यांच्याकडे कुठून पैसे आले, आमची तहसीलदारांना विनंती आहे की, या खोटा अंदाज वर्तवणाऱ्या लोकांच्या बँक अकाऊंटची चौकशी करा, पैसे कुठून आले, जर ही लोक मनी लाँड्रिंग करत असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. जर यांच्याकडे २० कोटी रुपयांच्या पैशा जास्त संपत्ती असेल तर ईडी अंतर्गत चौकशी झाली पाहिजे, अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे.
advertisement
"गेली ५ वर्ष या लोकांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आज चांगले दिवस आले होते, सांगलीत बेदाण्यासाठी आंदोलन केलं होतं.३०० रुपयांपर्यंत भाव गेला होता. आमची पोरं आणि बायकांच्या चेहऱ्यांवर आनंद आला होता. पण या हरामXXX ने एक व्हिडीओ तयार केला आणि पावसाची अफवा केली. त्यामुळे ३०० रुपयांचा भाव हा ५० रुपयांवर द्राक्षांचा दर आणला.  याची नुकसान भरपाई या अंदाज वर्तवणाऱ्याच्या बँक खात्यातून सरकारने वसूल करून दिली पाहिजे. याला मोकाट जर सोडलं तर अती फाजीलपणा करणार आहे, नाव घेण्याची लायकीची माणसं नाही ही,  त्याामुळे नाव घेत नाही. सगळ्यांचा नाद करा, पण बागयतदाराचा नाद करू नका, मी क्रांती सेना नाना पाटलांच्या विचारांचा माणूस आहे, जर इथून पुढे शेतकरी, बागतदाराच्या पालावर पाय टाकू नका, याद राखा, तिथे सोडलं नाही, इथं सोडणार नाही. इथून पुढे खोटा अंदाज वर्तवला तर बागयदाराचा काय हिस्का असतो दाखवून देऊ, चॅलेंज देऊनच बघा, नाही हिस्सा दाखवला, तर सुट्टी देणार नाही. आम्ही मागे सरणार नाही. तू आमच्यासाठी चिल्लर आहे, द्राक्षाच्या सिझनमध्ये खोटा हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांनी माहिती देऊ नये, आम्हाला भारतीय हवामान खाते, कुलाबा वेधशाळा, अमेरिकन वेबसाईटकडून अंदाज येतो, तुमच्या अंदाजाची गरज नाही. जर दिला तर तुम्हाला आत घातल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
advertisement
"आपण जागरूक राहायचं,  घाबरून राहायचं नाही, यांचं लॉजिक नाही हे मॅजिक दाखवून भुलवायला लागले आहे. हे मॅजिक दाखवून जादूच्या कांड्या फिरवून नुकसान करायला लागले आहे' असंही चव्हाण यावेळी म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Panjabrao Dakh: 'फॉर्च्युनर घेऊन हवामानाचा अंदाज वर्तवणारा पंजाबराव डख खोटारडा माणूस, बंदी घाला, गुन्हे दाखल करा' शेतकरी कडाडले
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement