मनोज जरांगेंचं उपोषण सोडून विखे पाटील थेट दिल्लीला, अमित शहांची घेतली खास भेट
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नुकतीच झालेली भेट ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी अमित शाह यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतली. राधाकृष्ण विखे-पाटील हे महायुती सरकारचे नवे संकटमोचक म्हणून उदयाला आले आहेत. ऐन गणेशोत्सवात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना प्रत्येक मुद्दा समजावून सांगत उपोषण सोडण्यास राजी केले. त्यानंतर दोन दिवसात अमित शहा यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील राजकारणात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात नुकतीच झालेली भेट ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीत मराठा आरक्षणासंदर्भात काही ठोस चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
राज्यात चर्चांना उधाण
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यात
advertisement
राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना अधिक उधाण आले आहे. मराठा आरक्षणाबाबत पुढील रणनीती आखण्यासाठी ही भेट ठरवण्यात आली असावी, अशा चर्चाही रंगल्या आहेत.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री आदरणीय ना. अमित शाह जी यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला एनसीडीसीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध झाल्यामुळे कारखान्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असून, येत्या १५… pic.twitter.com/MZgtsoFeHC
— Radhakrishna Vikhe Patil (@RVikhePatil) September 6, 2025
advertisement
नेमकी भेट कशासाठी झाली?
अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच, नवीन गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एन.सी.डी.सी. लोनमुळे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर या कारखान्याचे नूतनीकरण पूर्ण झाले असून गाळप हंगामाचा शुभारंभ होणार आहे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमुख उपस्थिती लाभावी अशी विनंतीही यावेळी विखे पिता पुत्राने केली आहे. अमित शाह यांनी देखील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 06, 2025 9:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनोज जरांगेंचं उपोषण सोडून विखे पाटील थेट दिल्लीला, अमित शहांची घेतली खास भेट