Raigad : रायगडावर देशमुख कुटुंबाची आर्त हाक, शिवराज्याभिषेकाच्या दिनी न्यायासाठी साकडं

Last Updated:

Raigad : किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंब देखील रायगडावर दाखल झाले आहे.

News18
News18
रायगड : किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवप्रेमी रायगडावर दाखल झाले असून, संपूर्ण गड भगव्या पताकांनी सजला आहे. या ऐतिहासिक सोहळ्यात आज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते विधिवत शिवराज्याभिषेक पार पडणार आहे.
या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे कुटुंब देखील रायगडावर दाखल झाले आहे. त्यांची कन्या वैभवी देशमुख आणि बंधू धनंजय देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी न्यायासाठी साकडे घातले आहे. महाराष्ट्राने आम्हाला साथ दिली. त्यानंतर आम्हाला फक्त न्याय हवाय," असं भावनिक आवाहन वैभवी देशमुख हिने केलं.
advertisement

महाराजांच्या काळातील शिक्षा द्या...

वैभवीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील न्यायपद्धतीचा उल्लेख केला. तिने म्हटले की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना कठोर शिक्षा दिली जायची, आज त्या धर्तीवर गुन्हेगारांना शिक्षा दिली गेली तरच गुन्हेगारीला आळा बसेल," असं मत मांडलं. त्यांच्या वडिलांच्या हत्येनंतर न्याय मिळावा म्हणून देशमुख कुटुंब रायगडावर छत्रपतींना साकडं घालण्यासाठी आलेलं आहे.
advertisement
दरम्यान, आजच्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी गडावर जवळपासन लाखो शिव अनुयायांनी हजेरी लावली आहे. भगवा फडकवणारे शिवप्रेमी, ढोल-ताशांचे गजर, लेझीम पथकं आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी रायगडाचा कणाकण दुमदुमून गेला आहे.
बीडमधील केज तालुक्यात असणारे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाने राज्यात एकच खळबळ उडाली. राज्यात एकच संतापाची लाट उसळली होती. एसआयटी आणि सीआयडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. वाल्मिक कराड आणि इतरांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. तर, कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raigad : रायगडावर देशमुख कुटुंबाची आर्त हाक, शिवराज्याभिषेकाच्या दिनी न्यायासाठी साकडं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement