advertisement

Raj Thackeray On BJP: भाजपला पाठिंबा देणार का? राज ठाकरेंनी थेटच सांगितलं, ''मी सांगतोय ना...''

Last Updated:

Raj Thackeray On BJP: या शक्यतेच्या दरम्यानच भाजपला पाठिंबा देणार का, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: भाष्य केले आहे.

 भाजपला पाठिंबा देणार का? राज ठाकरेंनी थेटच सांगितलं, ''मी सांगतोय ना...''
भाजपला पाठिंबा देणार का? राज ठाकरेंनी थेटच सांगितलं, ''मी सांगतोय ना...''
मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर महापौर पदाच्या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईच्या सत्तेसाठी भाजपने एक मोठी खेळी रचली असून, मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. यामुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.  या शक्यतेच्या दरम्यानच भाजपला पाठिंबा देणार का, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: भाष्य केले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 'मराठी अस्मितेच्या' मुद्द्यावर एकत्र आले होते. दोन्ही ठाकरेंनी संयुक्तपणे भाजपविरोधात शड्डू ठोकला होता. मात्र, आता महापौर निवडीच्या वेळी राज ठाकरेंनी भाजपला साथ देण्याचे संकेत दिल्याने उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. मुंबई महापालिकेत सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी धडपडणाऱ्या भाजपने आता मनसेला आपल्या गळाला लावल्याचे बोलले जात होते. , भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात मनसेला महापालिकेतील काही महत्त्वाची पदे किंवा समित्यांमध्ये वाटा दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे काठवरचे बहुमत आहे. त्यातच मनसेच्या ६ नगरसेवकांची कुमक मिळाल्याने उद्धव ठाकरे एकाकी पडणार असल्याचे म्हटले जात होते. भाजपला पाठिंब्या देण्याबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
advertisement

राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबई महापालिकेत मनसे भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण आता खुद्द राज ठाकरे यांनीच यावर पडदा टाकला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
मनसे पदाधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला देण्यात येणाऱ्या पाठिंब्याबाबत भाष्य केले. आपण भाजपला मुंबई महापालिकेत पाठिंबा देणार नसल्याची स्पष्टोक्ती राज ठाकरे यांनी केली. मी स्वत: यावर बोलतोय, त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray On BJP: भाजपला पाठिंबा देणार का? राज ठाकरेंनी थेटच सांगितलं, ''मी सांगतोय ना...''
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement