Raj Thackeray On BMC Election : 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

Last Updated:

Raj Thackeray : मराठी आणि बिगर मराठी हा मुद्दा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले.

'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगर परिषद-नगर पंचायतीनंतर जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. सगळ्यांचे लक्ष मुंबई महापालिकेकडे लागले आहे. मराठी आणि बिगर मराठी हा मुद्दा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले.
आगामी महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता असणार, याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपकडून मुंबईचा महापौर हिंदू होणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर बीएमसी निवडणुकीत हिंदुत्व, हिंदू-मुस्लिम मुद्दा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर, दुसरीकडे विरोधकांकडून भाजप नेत्यांच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे.
advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय म्हणाले?

मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. मनसेकडून आयोजित कोकण महोत्सवात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय हालचालींबाबत सावधगिरी बाळगण्याची सूचना करताना मनसैनिकांना गाफील न राहण्याची सूचना केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “रात्र वैऱ्याची आहे… गाफील राहू नका.आजूबाजूला लक्ष ठेवा. मुंबईवर ज्या प्रकारचा डोळा आहे आणि मतदार याद्यांवर ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे, त्यावर लक्ष ठेवा असे राज यांनी म्हटले. त्यांनी पुढे म्हटले की, ही आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठींसाठी शेवटची निवडणूक ठरू शकते. आपण गाफील राहिलो तर मुंबई हातातून गेली, असंच समजा असा इशारा त्यांनी दिला. मुंबई ही मराठी जनतेच्या हातातून गेल्यास ही लोक (सत्ताधारी) “थैमान घातलं जाईल” असा इशारा देत त्यांनी मराठी मतदारांना जागं राहण्याचं आवाहन केलं.
advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती?

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दोन्ही पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. मनसेने १२५ प्रभागाची यादी ठाकरे गटाकडे दिल्याची माहिती समोर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray On BMC Election : 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
Next Article
advertisement
Raj Thackeray On BMC Election : 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक
  • 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक

  • 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक

  • 'शेवटची निवडणूक असू शकते…', राज ठाकरेंच्या वक्तव्याने मोठी खळबळ, मनसेच्या कार्यक

View All
advertisement