Shamita Shetty : दुसऱ्यांदा प्रेमात पडली शमिता शेट्टी! एक्स बॉयफ्रेंड अजूनही बिग बॉसच्या घरातच अडकलाय
- Published by:Priya Lad
Last Updated:
Shamita Shetty : शमिता शेट्टी सध्या तिच्या नव्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. याआधी बिग बॉसच्या घरात तिचं प्रेम जुळलं होतं, त्याच्यासोबत ब्रेकअप झालं. आता शमिता आयुष्यात पुढे जाताना दिसत आहे, तर तिचा तो एक्स बॉयफ्रेंड अजूनही बिग बॉसच्या घरातच आहे.
advertisement
याचं कारण म्हणजे शमिताने त्या व्यक्तीसोबत रोमँटिक पोझ देत फोटो काढलेत. शिवाय त्या व्यक्तीनेही आय लव्ह यू म्हणत आणि लाल रंगाचं हार्ट इमोजी टाकत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शमिताचं नाव ज्या व्यक्तीसोबत जोडलं जात आहे, ती आहे दीपेश शर्मा. तो ग्लॅमरस दुनियेतील असला तरी त्याचा पेशा थोडा वेगळा आहे. तो एक प्रसिद्ध टेक्नो आर्टिस्ट आहे.
advertisement
दरम्यान शमिताचा याआधी 'बिग बॉस ओटीटी'मध्ये असताना प्रेमात पडली होती. तिचा एक्स बॉयफ्रेंड मराठी, तोसुद्धा एक अभिनेता. त्यांची जोडी शारा या नावाने प्रचंड गाजली. शमिता बिग बॉसमधून बाहेर येऊन तिनं पुढचं आयुष्य सुरू केल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे तिचा एक्स बॉयफ्रेंड मात्र अजूनही बिग बॉसच्या घरातच अडकला आहे.
advertisement
advertisement










