Honda Cityवर 1 लाखांहून जास्त बंपर डिस्काउंट! जबरदस्त डील, सोडू नका संधी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Honda City discount: जगभरात होंडाच्या कारचा जलवा वेगळाच आहे. होंडाचे जगभरात लाखो ग्राहक आहेत. आता कंपनीने आपल्या एका कारवर बंपर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे.
advertisement
किती मिळेल डिस्काउंट : तुम्ही Honda City खरेदी करत असाल तर जवळपास 1.28 लाख रुपयांपर्यंत बेनिफिट्स दिले जात आहेत. ज्यामुळे तुमची मोठी बजत होऊ शकते. सध्याचा काळ असा आहे, ज्यावेळी सर्व कंपन्या आपल्या गाड्यांच्या किमंती वाढवत आहेत. पण होंडाच्या या कारवर बंपर डिस्काउंट मिळत असल्याने ही डील दमदार ठरतेय. या कारची किंमत 11,95,300 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरु होते.
advertisement
एक्सटीरियर डिझाइन : सिटी स्पोर्टची बाहेरील डिझाइन खुप आक्रमक आणि स्ट्रायकिंग आहे. कारच्या फ्रंटमध्ये स्पोर्टी ब्लॅक ग्रिल देण्यात आली आहे. जी रेग्युलर मॉडलपेक्षा खुप वेगळी आहे. यासोबतच मागच्या बाजुला स्पोर्टी ब्लॅक ट्रंक लिप स्पॉयलर आणि ग्लॉसी ब्लॅक शार्क फिन अँटीना दिला गेला आहे. कारची ओळख खास बनवण्यासाठी यावर 'स्पोर्ट' चा एक्सक्लूसिव्ह अॅम्बेलमही लावण्यात आला आहे. मल्टी-स्पोक स्पोर्टी ग्रे अलॉय व्हील्स आणि ब्लॅक ORVMs याच्या लूकची शोभा आणखी वाढवते.
advertisement
प्रीमियम आणि स्पोर्टी इंटीरियर : गाडीच्या आत प्रवेश करताच, तुमचे स्वागत लगेचच स्पोर्टी ब्लॅक थीमने होते. लाल स्टिचिंगसह प्रीमियम ब्लॅक लेदर सीट्स दिलेले आहेत, जे स्टीअरिंग व्हील आणि डोअर इन्सर्टपर्यंत देखील पसरलेले आहेत. गडद लाल गार्निश आणि ग्लॉसी ब्लॅक एसी व्हेंट्स डॅशबोर्डला एक विशिष्ट टच देतात. काळ्या आणि लाल रंगाचे हे कॉम्बिनेशन केबिनला स्पोर्टी आणि प्रीमियम लूक देते.
advertisement
दमदार परफॉर्मेंस : मायलेजविषयी बोलायचं झाल्यास 2025 होंडा सिटी स्पोर्टमध्ये 1.5 लिटरचा i-VTEC पेट्रोल इंजन दिला आहे. जो आता E20 इंधनच्या अनुकूल आहे. हे इंजिन 121 PS ची पॉवर आणि 145 Nm चा टॉर्क जनरेट करते. स्मूथ ड्रायव्हिंगसाठी यामध्ये CVT गियरबॉक्सस पॅडल शिफ्टर्सही मिळतात. कंपनीचा दावा आहे की, ही कार 18.4 km/l चा शानदार मायलेज देण्यात सक्षम आहे. जी शहर आणि हायवे दोन्हीसाठी बेस्ट आहे.










