'मोठे मोठे गार केले गंमतमधी...', धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेला कैलास फडचा इशारा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडचणीत सापडत आहेत. आता नव्या प्रकरणाने धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अडचणीत सापडत आहेत. मागील वर्षी बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहकारी वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचं दिसून आलं. या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
नागपूर येथील महिला रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडेंसह त्यांचे सहकारी कैलास फड, निखील फड यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. निलंबित केलेल्या पतीला सरकारी नोकरीत पुन्हा रुजू करतो, असं आश्वासन देऊन कैलास फड, निखील फड यांनी आपल्याकडून १७ लाख रुपये घेतले. हे पैसे धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत देण्यात आले. त्यांच्याच बंगल्यावर हे पैसे दिले, असा आरोप नागपूरकर यांनी केला. नागपूरकर यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
advertisement
कैलास फड याने रंजना नागपूरकर यांचे आरोप फेटाळून लावले होते. आम्ही कसलेही पैसे घेतले नाहीत, असा दावा त्याने केला होता. या सगळ्या घडामोडीनंतर आता कैलास फड याने रंजना नागपूरकर यांना थेट इशारा दिला आहे. फेसबूकवर पोस्ट लिहित रंजना नागपूरकर यांनी चौकशीला हजर राहा, असं म्हटलं आहे. आता संयम संपला असंही त्याने फेसबूकवर लिहिलं आहे. यामुळे आता बीडमध्ये पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
advertisement
कैलास फड फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाला?
कैलास फड याने आपल्या फेसबूक अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. तो एका काळ्या रंगाच्या कारसमोर उभा राहिल्याचं दिसत आहेत. त्याच्या हातात मोबाईल आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने रंजना नागपूरकर यांना इशारा दिला आहे. कॅप्शनमध्ये कैलास फड म्हणाला की, "मोठ मोठे गार केले गंमतमधी, हाताने कपडे फाडून भों*** झाले चौकामधी. नागपूरची सुपारी कुणी दिली याचा शोध लागला पाहिजे. रंजना नागपूरकर लवकरच चौकशीला तयार राहा... जशास तसे उत्तर दिले जातील, आता संयम संपला."
advertisement

रंजना नागपूरकर यांनी नेमका आरोप काय केला?
रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडे, कैलास फड आणि निखील फड यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. त्यांच्या पतीला सरकारी नोकरीत पुन्हा रुजू करून घेण्यासाठी मुंडे यांनी पैसे मागितले. त्यांनी २५ लाखांची मागणी केली होती. मात्र नंतर ही रक्कम कमी करून १७ लाख करण्यात आली. मी दोन तासांच्या अंतराने एकदा आठ तर एकदा नऊ लाख रुपये धनंजय मुंडेंच्या घरी नेऊन दिले. 'मी एकूण 17 लाख रुपये दिले. प्रथम परळीतील मुंडे यांच्या घरी गेल्या तेव्हा मुंडे यांनी सांगितलं, “जा, तुमचं काम आता पूर्ण झालं आहे.” पण नंतर ना पतीची नोकरी मिळाली, ना पैसे परत मिळाले', असा आरोप त्यांनी केला आहे.
advertisement
मानेवर पिस्तूल लावून धमकी
'मी पुन्हा पैसे मागायला परळीतील घरात गेले. तेव्हा तिथे धनंजय मुंडे, कैलास फड, निखील फड यांच्यासोबत मुंडे यांच्या पत्नी आणि आईही उपस्थित होत्या. त्यावेळी मुंडे यांच्यासमोरच माझ्या मानेवर पिस्तूल लावून भीती घातल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. “तू पुन्हा आलीस तर तुला गाडून टाकू, कुणालाही कळणारही नाही”, अशी धमकी मला देण्यात आली. या धमकीनंतर रंजना यांनी त्यांच्या बंगल्यावर जाणं बंद केल्याचा आरोप रंजना नागपूरकर यांनी केला.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Feb 24, 2026 1:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'मोठे मोठे गार केले गंमतमधी...', धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेला कैलास फडचा इशारा









