विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दिलासा; नाव, जन्मतारीख आणि जात दुरूस्तीची प्रक्रिया होणार जलद

Last Updated:

विद्यार्थ्यांच्या नावामध्ये, जन्मतारखेमध्ये आणि जातीमध्ये जर काही चूक झाली असेल तर भविष्यामध्येही त्यासाठी अडचण होऊ नये, या दुरूस्तीसाठी शाळेमार्फत शिक्षण विभागाकडे योग्य कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केला आहे.

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नाव, जन्मतारीख आणि जात दुरूस्तीची प्रक्रिया होणार जलद
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नाव, जन्मतारीख आणि जात दुरूस्तीची प्रक्रिया होणार जलद
विद्यार्थ्याच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरूस्ती करता येणार आहे, असं शालेय विभागाने सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या नावामध्ये, जन्मतारखेमध्ये आणि जातीमध्ये जर काही चूक झाली असेल तर भविष्यामध्येही त्यासाठी अडचण होऊ नये, या दुरूस्तीसाठी शाळेमार्फत शिक्षण विभागाकडे योग्य कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केला आहे. या निर्णयामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना दिलास मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या नावामध्ये बदल झाला आहे, त्यांच्या नावामध्ये शाळा बदल करून देणार आहे.
माध्यमिक शाळा संहिता नियम क्र. 26 नुसार जे इयत्ता पहिली ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुरूस्ती लागू केली आहे. शालेय रेकॉर्डच्या दुरूस्तीची प्रक्रिया सात दिवसांत होत असल्याने पालकांनाही आणि विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या नावामध्ये, जातीमध्ये आणि जन्मतारखेमध्ये दुरूस्तीचा अधिकार थेट शाळेलाच देण्यात आला आहे. जर, विद्यार्थ्याचं नाव आधारकार्डामध्ये असलेल्या नावासोबत नाही जुळलं तर 14 ऑगस्ट 2017 च्या शासन निर्णयानुसार शाळांना थेट नाव बदल करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
advertisement
जात दुरूस्तीसाठी जात प्रमाणपत्र, पालकांचा अर्ज, आधारकार्ड आणि वडिलांच्या जात दाखल्याची प्रत आदी कागदपत्रांसोबत शिफारस अर्ज सादर केल्यानंतर सात दिवसांत निर्णय दिला जातो. तर, जन्मतारीख दुरूस्तीसाठी जन्मदाखला, पालकांचे हमीपत्र, आधारकार्ड आणि शाळेचा अर्ज सादर करावा लागतो. यानंतरही पडताळणीसह सात दिवसांत मंजुरी दिली जाते. दुरूस्तीसाठीची प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी शिक्षण निरीक्षक कार्यालयाने ऑनलाईन मागोवा घेण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर प्रस्तावात काही त्रुटी आढळली तर शाळेला तातडीने कळवले जाते.
advertisement
मंजुरी मिळाल्यानंतर शाळेने दुरूस्ती केल्याची नोंद जनरल रजिस्टरमध्ये प्रस्तावाच्या जावक क्रमांकासह करणे बंधनकारक आहे. योग्य कागदपत्रे आणि प्रक्रिया पाळल्यास दुरूस्ती जलद आणि सोप्पी होते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दिलासा; नाव, जन्मतारीख आणि जात दुरूस्तीची प्रक्रिया होणार जलद
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement