Rohit Arya : रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवलेल्या स्टुडिओत पोलिसांना काय सापडलं? समोर आली मोठी अपडेट...
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
Mumbai Rohit Arya Case: आरोपी रोहित आर्याने मुलांना बंदी बनवून ठेवलेल्या स्टुडिओची पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी धक्कादायक साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई: पवईत गुरुवारी सायंकाळी घडलेल्या ओलीस नाट्य आणि चकमक प्रकरणात धक्कादायक प्रकरणात नवे तपशील समोर आले आहेत. आरोपी रोहित आर्याने मुलांना बंदी बनवून ठेवलेल्या स्टुडिओची पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यावेळी पोलिसांनी धक्कादायक साहित्य जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारसाठी 'स्वच्छता मॉनिटर' अभियान चालवणाऱ्या रोहित आर्याने गुरुवारी गुन्हेगारी कृत्य केले. त्याने ऑडिशनच्या नावाखाली काही मुलांना पवईतील आरए स्टुडिओमध्ये बोलावून घेतलं. यानंतर यातील १७ मुलांचं त्यानं अपहरण केलं. स्टुडिओत सर्वांना ओलीस ठेवले. या दरम्यान, त्याने एक व्हिडीओ जारी करून आपण दहशतवादी नसून कोणलाही इजा पोहचवण्याचा इरादा नसल्याचे म्हटले होते. ओलीस ठेवलेल्या मुलांच्या सुटकेसाठी पोलिसांनी ऑपरेशन सुरू केले. मात्र, पोलिसांच्या चकमकीत रोहित आर्य ठार झाला.
advertisement
रोहित आर्य याने मुलांना स्टुडिओत ओलीस ठेवले होते. त्याठिकाणाहून पोलिसांनी शस्त्र आणि धोकादायक साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्टल, पेट्रोलचा डबा, ज्वलनशील रबर सोल्यूशन आणि लायटर जप्त केल्याचे सूत्रांनी पुष्टी केली आहे.
या प्रकरणी पवई पोलिसांनी मृत आरोपी रोहित आर्यावर भारतीय न्याय संहिता (BNS 2023) कलम 109(1), 140 आणि 287 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. प्राथमिक तपासानंतर हे प्रकरण आता गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे.
advertisement
पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व वस्तू न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (FSL) तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत. या साहित्याचा वापर कशासाठी होणार होता, आणि आरोपीने पूर्वनियोजित कट आखला होता का, याची सखोल चौकशी सुरू आहे.
पवईतील या घटनेमुळे स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मते, घटनास्थळावर सापडलेल्या ज्वलनशील पदार्थांमुळे आरोपीच्या हेतूबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या तपासात आता आणखी कोणती माहिती समोर येईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Arya : रोहित आर्याने मुलांना ओलीस ठेवलेल्या स्टुडिओत पोलिसांना काय सापडलं? समोर आली मोठी अपडेट...


