advertisement

Rohit Pawar : 'हा विकृतीचा कळस...', कंबरेत लाथ घेणाऱ्या DYSP वर रोहित पवार कडाडले, कारवाईची मागणी

Last Updated:

जालना जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदोलकाला पोलिसांनी हुसकावून लावण्याची घटना घडली होती.

rohit pawar
rohit pawar
Rohit Pawar News : जालना जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा ताफा अडवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदोलकाला पोलिसांनी हुसकावून लावण्याची घटना घडली होती.इतकंच नाही तर DYSP अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत फिल्मी स्टाईलमध्ये लाथ मारल्याची घटना घडली होती. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओ पाहून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार प्रचंड भडकले आहेत.
advertisement
रोहित पवार यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. खून, बलात्कार, दरोडा अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस लाथा घालत असतील तर एकवेळ मान्य करता येईल, पण महिनाभर उपोषण करुनही न्याय मिळत नसल्यामुळे मंत्र्यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या नागरिकाच्या कंबरेत DYSP अनंत कुलकर्णी नावाचा अधिकारी फिल्मी स्टाईलने लाथ घालत असेल तर हा विकृतीचा कळस आहे,अशी संतप्त टीका त्यांनी केली आहे. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा, अशी मागणी आता रोहित पवार यांनी केली आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय?

जालना जिल्ह्यात आज स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे येणार होत्या. त्यामुळे जालन्यात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना हुसकावून लावलं. त्यानंतर पोलीस आंदोलकाला नेत असताना पोलीस उप अधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकाच्या कमरेत अगदी फिल्मी स्टाईल लाथ मारल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना आता कॅमेरात कैद झाला.
advertisement
 एका कौटुंबिक वादातून जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र पोलीस आरोपींना सहकार्य करत असून फिर्यादीना त्रास देत आहे, असा आरोप करत अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. आज पालकमंत्री पंकजा मुंडे या जालन्यात स्वातंत्र्य दिनासाठी आले असता त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.
advertisement
यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेताच स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीस आंदोलकाला ताब्यात घेऊन जात असतानाच डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी धावत येत अगदी फिल्मी स्टाईलने आंदोलकाच्या कमरेत लाथ घातल्याच पहायला मिळालं आहे.
advertisement
दरम्यान अनंत कुलकर्णी यांच्या अशा वागण्यावरून सध्या सर्वत्र सध्या टीका होत आहे. आपल्यावर होत असलेल्या अन्यायासाठी न्याय मागणाऱ्या आंदोलकाला लाथ मारल्याने पोलिस प्रशासनाविरोधात सामान्य जनतेमध्ये राग व्यक्त होतोय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar : 'हा विकृतीचा कळस...', कंबरेत लाथ घेणाऱ्या DYSP वर रोहित पवार कडाडले, कारवाईची मागणी
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement