Mahadev Jankar : मुख्यमंत्री कधीच नाही पण 5 मिनिटं तरी पंतप्रधान होईन, जानकरांचं विधान

Last Updated:

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पंतप्रधान पदाबाबत मोठं विधान केलं असून त्यांनी प्रचारसभेत भाजपवर जोरदार टीका केलीय.

महादेव जानकर
महादेव जानकर
धाराशीव : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार शिगेला पोहोचला असून प्रचाराच्या तोफा काही तासात थंडावतील. दरम्यान, प्रचारसभेत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी मोठं विधान केलंय.  महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही पण पाच मिनिटांसाठी तरी देशाचा पंतप्रधान होईन असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केलं. रासपच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत बोलताना जानकर यांनी हे वक्तव्य केलंय. यावेळी त्यांनी भाजपवरही जोरदार टीका केली.
महादेव जानकर यांनी म्हटलं की, आईची शप्पथ घेऊन सांगतो, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही. पण पाच मिनिटांसाठी का होईना पण देशाचा पंतप्रधान झाल्याशिवाय राहणार नाही.
भूम शहरात रासपचे उमेदवार डॉक्टर राहुल घुले यांच्या प्रचारासठी महादेव जानकर यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना महादेव जानकर यांनी पंतप्रधान पदाबाबद विधान केलं. तसंच भाजपवरही फोडाफोडीच्या राजकारणावरून टीका केली.
advertisement
महादेव जानकर म्हणाले की, भाजपने पवारांचं घर फोडलं. बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह चोरलं. भाजप ही चालू पार्टी आहे. ते माणसात माणूस आणि पक्षात पक्ष ठेवत नाहीत अशा शब्दात जानकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahadev Jankar : मुख्यमंत्री कधीच नाही पण 5 मिनिटं तरी पंतप्रधान होईन, जानकरांचं विधान
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement