Municipal Election : संभाजीनगरमध्ये वारं फिरलं, मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर ठाकरेंची मोठी खेळी, वातावरण तापणार
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत,अशा शब्दात ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये मोठी खेळी केली आहे.
Municipal Election 2026 : अविनाश कानडजे, प्रतिनिधी (छत्रपती संभाजीनगर) : संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीआधीच वातावरण तापायला सूरूवात झाली आहे. या गोष्टीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रशीद मामु जबाबदार ठरले आहे. खरं तर रशीद मामू यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशिष्ट लोकांचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत,अशा शब्दात ठाकरे गटावर टीका केली होती. या टीकेनंतर उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरमध्ये मोठी खेळी केली आहे.या खेळीमुळे संभाजीनगरच वातावरण आणखी तापण्याच शक्यता आहे.
खरं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रशीद मामू यांच्या शिवसेना प्रवेशावरून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला काही तास उलटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोठी खेळी केली आहे. त्याचं झालं असं की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संभाजीनगरमध्ये प्रचाराला सूरूवात केली आहे. या प्रचाराला रशीद मामू यांनी हजेरी लावली होती.
advertisement
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आज संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मशाल रॅली काढली होती. या रॅलीला रशीद मामूने देखील हजेरी लावली होती. विशेष म्हणजे रशीद मामू गळ्यात भगवं उपरण परिधान करून या मशाल रॅलीत सहभागी झाले होते.त्यामुळे या मशाल रॅलीला एक वेगळे रूप आले होते. तसेच ही रॅली चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या मशाल रॅलीमुळे आता संभाजीनगरमधील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेसचे माजी महापौर रशीद मामू यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. शिवसेना युबीटीचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादान दानवे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला होता.
मला अतिशय दु:ख आहे, की हिदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सुपूत्राने अशाप्रकारे मतांचे लांगूलचालन करण्यासाठी अशा व्यक्तीला प्रवेश दिला आहे. त्यातून त्याचे चरीत्र आणि त्यांची दिशा स्पष्ट होत आहे. त्यांना आता लांगूलचालन करायचे आहे. विशिष्ट लोकायचे जोडे चाटायचे आहेत आणि त्यातून मते मिळवायची आहेत.पण जनता हे बघत आहे. देशप्रेमी, देशभक्त आणि राष्ट्रवादी लोकं हे पाहत आहेत. त्यामुळे याचं नुकसान त्यांना सहन करावचं लागेल,अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 8:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Municipal Election : संभाजीनगरमध्ये वारं फिरलं, मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर ठाकरेंची मोठी खेळी, वातावरण तापणार










