यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी अध्यक्षपद डोळ्यासमोर ठेवत अनेक ठिकाणी प्रभावी महिला उमेदवारांना मैदानात उतरवले आहे.
मागील निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. यंदाही जिल्ह्यात महायुतीला पोषक वातावरण असल्याचे चित्र आहे. मात्र महाविकास आघाडीने आक्रमक रणनीती आखल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यंदा बहुतांश ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती पाहायला मिळत आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट राजकीय लढत होत असून स्थानिक पातळीवरही प्रतिष्ठेची झुंज रंगली आहे.



