Sangli News: मला दुचाकी का दिली नाही? मित्र कोयता घेऊन आला अन्..., सांगलीत खळबळ
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sangli News: 25 वर्षाच्या नयन पांढरे याने संदेशला शुक्रवारी त्याची दुचाकी मागितली होती. मात्र काही कारणाने त्याने दिली नाही.
सांगली: सध्याच्या काळात अगदी क्षुल्लक कारणावरून देखील टोकाचे वाद होताना दिसतात. सांगलीत असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. केवळ दुचाकी दिली नाही म्हणून दोघा मित्रांत वाद झाला. तो इतका टोकाला गेला की एकजण थेट कोयता घेऊन आला. या हल्ल्यात कसबेडिग्रज येथील संदेश दीपक पांढरे हा तरुण जखमी झाला असून याप्रकरणात नयन प्रवीण पांढरे याच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं झालं असं
25 वर्षाच्या नयन पांढरे याने संदेशला शुक्रवारी त्याची दुचाकी मागितली होती. मात्र काही कारणाने संदेशने दिली नाही. याच गोष्टीचा राग नयनने डोक्यात ठेवला; आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास कसबे डिग्रज गावच्या कमानीतून घरी निघालेल्या 22 वर्षीय संदेशला गाठलं. 'काल दुचाकी का दिली नाहीस' म्हणून धारदार कोयत्याने हल्ला केला. संदेशने बचावासाठी हात पुढे केल्यानंतर डाव्या हातावर वार लागून जखमी झाला. त्यानंतर देखील नयनने मारहाण केली.
advertisement
परिसरात खळबळ
view commentsअगदी किरकोळ कारणातून मित्रानेच मित्रावर हल्ला केल्याच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. तसेच विशी-पंचविशीतील तरुणांत वाढत्या गुन्हेगारीचे प्रकार चिंताजनक आहेत. मुलांनी संयम बाळगावा आणि रागावर नियंत्रण ठेवावे, असे नागरिकांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 10:06 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli News: मला दुचाकी का दिली नाही? मित्र कोयता घेऊन आला अन्..., सांगलीत खळबळ











