तुमची मुलगी माझ्या पतीला फोन का करते? सांगलीत राडा, 80 वर्षाच्या वृद्धासह महिलेसोबत...
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sangli News: बुधवारी सकाळी वृद्धासोबत एका महिलेचा वाद झाला. “तुमची मुलगी सारिका माझ्या पतीस फोन का करते?” असा जाब तिने विचारला.
सांगली: कौटुंबिक कलहातून एका 80 वर्षांच्या वृद्धासह मुलीला लाकडी बॅटने मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत घडला आहे. किसन चिलाप्पा भोसले असे जखमी वृद्धाचे नाव असून ते सांगलीतील रमामातानगर परिसरात राहतात. या प्रकरणी संशियत विशाखा राहुल ढमाळ, रुद्र राहुल ढमाळ आणि श्रद्धा राहुल ढमाळ (सर्व रा. लक्ष्मी मंदिरानजीक, सांगली,) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं घडलं काय?
संशयित विशाखा ढमाळ हिचा बुधवारी सकाळी किसन भोसले यांच्यासोबत वाद झाला. “तुमची मुलगी सारिका माझ्या पतीस फोन का करते?” असा जाब तिने विचारला. त्यानंतर काही वेळाने अन्य दोघांनी संशयित किसन यांच्या घराबाहेर येऊन दंगा सुरू केला. तेव्हा किसन, सारिका आणि रुद्र घराबाहेर आले. त्यांना शिवीगाळ करत बॅटने मारहाण करण्यात आली.
advertisement
दरम्यान, वाद वाढत गेल्याने किसन आणि रुद्र भांडण सोडवण्यासाठी आले होते. त्यांनाही मारहाण करण्यात आली. यामध्ये ते जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
view commentsLocation :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 12:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
तुमची मुलगी माझ्या पतीला फोन का करते? सांगलीत राडा, 80 वर्षाच्या वृद्धासह महिलेसोबत...









