Government Scheme: ‘संजय गांधी’, ‘श्रावणबाळ’ योजनेबाबत मोठी बातमी, दरमहा मानधन वाढलं, आता किती मिळणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Sanjay Gandhi Yojana: राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ केली आहे. आता त्यांना दरमहा 1 हजार रुपये जास्त मिळतील.
पुणे : राज्य सरकारने दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत मिळणाऱ्या अर्थसहाय्यात 1,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
यामुळे यापुढे लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये मिळणार आहेत. यापूर्वी ही मदत 1,500 रुपये इतकी होती. वाढीव अनुदानाची अंमलबजावणी ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
1500 ऐवजी आता दरमहा 2500 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून विधवा, निराधार पुरुष, गंभीर आजारी रुग्ण, तुरुंगात असलेल्या कैद्यांची कुटुंबे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब आणि विशेषत 65 वर्षांखालील दिव्यांगांना आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत या दोन्ही योजनांमधून दिव्यांगांना दरमहा 1,500 रुपये मिळत होते. आता या रकमेत 1,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.वाढीव मदत ऑक्टोबरपासून लागू होणार असून प्रत्यक्षात नोव्हेंबरपासून वाढीव रकमेचे वितरण सुरू होईल, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
संजय गांधी निराधार अनुदान योजना
संजय गांधी निराधार योजना ही राज्यातील सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या घटकांना दिलासा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विधवा महिला, निराधार पुरुष, गंभीर आजारी रुग्ण, तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची कुटुंबे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे कुटुंब तसेच 65 वर्षांखालील दिव्यांग व्यक्तींना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार या मदतीत वाढ करण्यात आली असून आता दरमहा 2,500 रुपये अनुदान दिले जाणार आहे.
advertisement
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना
श्रावणबाळ योजना ही 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वृद्ध निराधार व्यक्तींना आर्थिक मदत पुरवते. वृद्धापकाळात त्यांना आर्थिक आधार मिळावा आणि सन्मानाने जगता यावे, हा या योजनेचा उद्देश आहे. शासनाच्या अलीकडील निर्णयानुसार या योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना देखील वाढीव दराने दरमहा 2,500 रुपये मिळणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 11, 2025 2:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Government Scheme: ‘संजय गांधी’, ‘श्रावणबाळ’ योजनेबाबत मोठी बातमी, दरमहा मानधन वाढलं, आता किती मिळणार?