Pune Mhada Lottery : म्हाडाची मोठी घोषणा! पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार साकार, म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी जाहीर

Last Updated:

Pune Mhada Lottery 2025 : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न आता साकार होणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात म्हाडातर्फे तब्बल 4186 घरांच्या भव्य सोडतीची घोषणा करण्यात आली आहे. परवडणाऱ्या दरात स्वतःचं घर मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

News18
News18
पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे शहरात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाने 4186 घरांच्या भव्य सोडतीची घोषणा केली आहे.या सोडतीत पंतप्रधान आवास योजना अंतर्गत 219, म्हाडा गृहनिर्माणात 1683, 15% सामाजिक गृहनिर्माणात 864 आणि 20% सर्वसमावेशक गृहयोजनेत 3322 घरे उपलब्ध आहेत. इच्छुकांनी निश्चित वेळापत्रकानुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 11 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 पासून होणार आहे. त्याच दिवशी ऑनलाईन अनामत रक्कम स्वीकारण्याचीही सुरुवात होईल. अर्जदारांना शेवटचा अर्ज सादर करण्याची संधी 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:55 पर्यंत असेल. त्याचप्रमाणे अनामत रक्कम ऑनलाईन भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:59 पर्यंत ठेवण्यात आली आहे. जे अर्जदार बँकेद्वारे RTGS/NEFT पद्धतीने रक्कम भरणार असतील, त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेतच पैसे भरावेत.
advertisement
सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्राथमिक यादी 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:०० वाजता प्रसिद्ध होईल. या प्राथमिक यादीवर दावे किंवा हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. अंतिम यादी 17 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:00 वाजता प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12:00 वाजता घरांच्या सोडतीचे आयोजन केले जाईल. यशस्वी अर्जदारांची नावे त्याच दिवशी सायंकाळी 6:00 वाजता अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील.
advertisement
या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सोयीसाठी अर्जदारांनी सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर तपासून घ्यावी. नोंदणी, अर्ज भरणे, रक्कम भरणे व सोडतीसंबंधी सर्व घडामोडी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्यामुळे अर्जदारांनी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करून अर्ज सादर करावा. ही संधी अनेकांसाठी स्वतःचे घर मिळविण्याची ठरू शकते.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Mhada Lottery : म्हाडाची मोठी घोषणा! पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार साकार, म्हाडातर्फे 4186 घरांची लॉटरी जाहीर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement