Sanjay Raut : बाळासाहेबांचा विसर पडला! 'त्या' जाहिरातीवरून राऊतांनी एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
Sanjay raut Criticize Eknath shinde : संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. एकनाथ शिंदे शंभर टक्के उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, त्यांच्यात दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत नाही.
Sanjay raut Criticize Eknath shinde : प्रशांत लिला रामदास, नवी दिल्ली : महायुतीचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर गुरूवारी दिमाखात पार पडला आहे. या शपथविधीसाठी महायुतीकडून वृत्तपत्रात मोठ्या प्रमाणावर जाहिरात बाजी करण्यात आली होती. या जाहिरातीत महायुतीला बाळासाहेबांचा विसर पडल्याचे दिसून आले. ज्या बाळासाहेबांच्या नावाने एकनाथ शिंदे पक्ष चालवतात, त्याचाच विसर आता पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आता शिवसेना उबीटीचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडलं आहे. नेमकं
संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले होते. या ट्विटमध्ये राऊत म्हणतात, एकनाथ शिंदे ऊठसुठ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरतात. पण या प्रमुख जाहिरातीत साहेबांचा फोटो का नाही? असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे. त्यासोबतच हे विचारण्याची हिंमत नाही, असा टोला देखील त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.
advertisement
दरम्यान शपथविधीच्या दिवशीही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. एकनाथ शिंदे शंभर टक्के उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, त्यांच्यात दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत नाही. अडीच वर्षापु्र्वी ही हिंमत नव्हती म्हणूनच तर त्यांनी शिवसेना सोडली,अशा शब्दात राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती.
एकनाथ शिंदे ऊठसुठ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरतात.
पण या प्रमुख जाहिरातीत साहेबांचा फोटो का नाही? हे विचारण्याची हिंमत नाही. pic.twitter.com/oxdoBEeQzd
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 5, 2024
advertisement
जाहिरातीत मोठी चूक
महायुतीच्या या जाहिरातीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील टीका केली आहे.जाहिरातींमध्ये वरील बाजूला महापुरुषांचे फोटो छापले आहे. यामध्ये शाहू महाराजांचा फोटो न झापल्याने संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला आहे.
संभाजीराजे म्हणाले, जाहिरातीमध्ये महापुरुषांची फोटो छापले मात्र शाहू महाराजांचा फोटो छापला नाही हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राला घडवण्यामध्ये शाहू, फुले, आंबेडकरांचे मोठे योगदान आहे. शाहू महाराजांना बाजूला करून जी जाहिरात दिली ती चालणार नाही. महाराष्ट्राला ही न पटणारी गोष्ट आहे. शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट आम्ही खपवून घेणार नाही भाजपने ही चूक दुरुस्त करावी.
view commentsLocation :
New Delhi,Delhi
First Published :
December 06, 2024 9:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : बाळासाहेबांचा विसर पडला! 'त्या' जाहिरातीवरून राऊतांनी एकनाथ शिंदेंना कोंडीत पकडलं


