नाशिकच्या राजकारणात खळबळ! मंत्री अन् आमदाराच्या 'त्या' संभाषणाचा व्हिडिओ संजय राऊतांकडून शेअर, प्रकरण काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Election 2026 : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेत ७२ जागांवर विजय मिळवला असून स्पष्ट बहुमतासह पक्षाने सत्ता काबीज केली आहे.
नाशिक : महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने मोठी झेप घेत ७२ जागांवर विजय मिळवला असून स्पष्ट बहुमतासह पक्षाने सत्ता काबीज केली आहे. भाजपनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेला २६, ठाकरे गटाला १५ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला केवळ ३, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला ४ जागांवर समाधान मानावे लागले, तर मनसेला एक आणि एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे. बहुमताचा आकडा सहज पार केल्याने, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता महापौरपदासाठी कोणत्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
खासदार संजय राऊतांनी व्हिडिओ केला शेअर
दरम्यान, या विजयाच्या आनंदात भाजपकडून जल्लोष सुरू असतानाच, राजकीय वातावरण तापवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार राहुल ढिकले यांच्यातील कथित संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकमधील भाजप कार्यालयात विजयाचा आनंद साजरा होत असताना, मंत्री महाजन यांच्या शेजारी बसलेले आमदार ढिकले यांच्याशी ते कानगोष्टी करताना या व्हिडीओत दिसतात.
advertisement
(आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार)
राहुल ढिकले- साने निवडून आला महंजे अवघड आहे
तुमची कृपा
गिरीश महाजन: मुसलमानांना मुळे झाला *चिपड्या* बोला साहब आपको पॅनल नही निकाल के दिया तो मुझे जेल मे डाल देना काय महंतो/ अगर मैंने तुमको वोटिंग निकाल के नहीं दिया तो
आमदार बाई भेटू देत नवती pic.twitter.com/0Dp0kzYryw
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 20, 2026
advertisement
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत आमदार ढिकले हे “साने निवडून आला म्हणजे अवघड आहे, तुमची कृपा,” असे म्हणताना ऐकू येतात. यावर मंत्री गिरीश महाजन काही आक्षेपार्ह विधान करत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. या संवादाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी “आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार?” असे कॅप्शन देत भाजपवर टीका केली आहे.
advertisement
मतदान टक्केवारीत घट, तरीही भाजपला यश
यंदाच्या महापालिका निवडणुकीत ५६.७६ टक्के मतदान झाले, जे २०१७ च्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे निकाल वेगळे लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच आयाराम-गयाराम, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना पक्षात प्रवेश दिल्याचे आरोप, तपोवन वृक्षतोड प्रकरणातील वादग्रस्त भूमिका आणि अंतर्गत बंडखोरी यांमुळे भाजपला फटका बसू शकतो, अशी चर्चा होती.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 2:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकच्या राजकारणात खळबळ! मंत्री अन् आमदाराच्या 'त्या' संभाषणाचा व्हिडिओ संजय राऊतांकडून शेअर, प्रकरण काय?









