Sanjay Raut : 'हात लिहिता राहिला पाहिजे...' सलाइन अन् थरथरणारा हात, संजय राऊतांचे रुग्णालयातून ट्वीट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sanjay Raut Health Updates : आज, संजय राऊत यांनी ट्वीट केले. संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये फोटो पोस्ट केला.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे सध्या प्रकृती अस्वास्थामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत. बुधवारी, प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज, संजय राऊत यांनी ट्वीट केले. संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये फोटो पोस्ट केला.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पांढऱ्या पेशी मंगळवारी अचानक कमी झाल्या. त्यानंतर मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील काही दिवसांपासून संजय राऊत यांची प्रकृती ठीक नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक निवेदन जारी करत आपण काही महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचे जाहीर केले होते.
प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी फोर्टिस रुग्णालयामध्ये नेण्यात येत आहे. मात्र, अचानकपणे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तपासणीदरम्यान त्यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे निष्पन्न झाले.
advertisement
राऊतांचे रुग्णालयातून ट्वीट...
संजय राऊत यांनी रुग्णालयातून ट्वीट केले. ट्वीटमध्ये त्यांनी फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत त्यांच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत असून त्यांनी ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे संपादकीय लिहिले असल्याचे दिसत आहे. या फोटोसोबत त्यांनी हात लिहिता राहिला पाहिजे. कसेल त्याची जमीन, लिहील त्याचे वृत्तपत्र, हा आमच्या पिढीचा मंत्र होता! असे कॅप्शन दिले आहे.
advertisement
हात लिहिता राहिला पाहिजे
कसेल त्याची जमीन
लिहील त्याचे वृत्तपत्र
हा आमच्या पिढीचा मंत्र होता! pic.twitter.com/AowQ9MhfLN
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 6, 2025
संजय राऊत यांच्या फोटोवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह नेटकऱ्यांनी चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 06, 2025 1:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : 'हात लिहिता राहिला पाहिजे...' सलाइन अन् थरथरणारा हात, संजय राऊतांचे रुग्णालयातून ट्वीट


