शिंदे 2019मध्येच मुख्यमंत्री झाले असते पण...; शरद पवारांच्या मुलाखतीनंतर राऊतांचा मोठा खुलासा
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादीतील नेत्यांचा विरोध होता असं मुलाखतीत म्हटलंय. याच मुलाखतीचा दाखला देत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही अनेक गौप्यस्फोट केले.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी होत आहे. दरम्यान, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शऱद पवार यांच्या मुलाखतीने आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादीतील नेत्यांचा विरोध होता असं मुलाखतीत म्हटलंय. याच मुलाखतीचा दाखला देत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही अनेक गौप्यस्फोट केले. महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत असा विचार सुरू होता. पण याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अजित पवार, सुनिल तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केला होता असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला आम्ही तयार होतो, पण शिवसेनेतील प्रमुख नेत्यांमध्येच चर्चा झाली नव्हती असं शरद पवार यांनी मुलाखतीत सांगितलंय. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊथ म्हणाले की, शरद पवार आणि राहुल गांधी यांनी असं मत मांडलं होतं की, मविआचं नेतृत्व अशा नेत्याने करावं जे आघाडीतील प्रत्येक घटकाला मान्य होईल. दोन्ही प्रमुख नेत्यांचं यावर एकमेत होतं. दरम्यान, तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील या नेत्यांचा शिंदेंच्या नावाला विरोध होता. आम्ही सिनियर आहे आणि ज्युनियरच्या हाताखाली काम करणार नाही अशी त्यांची भूमिका होती.
advertisement
शिवसेना आणि भाजपमध्ये 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद चालू असतानाच शिवसेनेच्या विधीमंडळ नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड झाली होती. मविआची स्थापना होण्याआधीचं हे मी सांगतोय. शिंदे तेव्हा विधीमंडळ नेते असल्याने मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचंच नाव पुढे गेलं असतं. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला शिंदे मुख्यमंत्रीपदी चालणार नाहीत असं सांगितलं. फडणवीस यांच्यासह भाजपचे जे नेते आज मंत्रिमंडळात आहेत त्यांचीही भूमिका हीच होती असाही गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला.
advertisement
काय म्हणाले शरद पवार?
२०१९ ला मविआत शिंदेंना सीएम करण्यास आमची हरकत नव्हती. शिंदे यांच्या नावावर शिवसेनेत चर्चा झाली पण शिंदेचं नाव आमच्या समोर आलं नाही. शिंदेंच्या नावाबद्दल अंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजलं. अजित पवार, तटकरे, वळसे पाटलांना शिंदे मुख्यमंत्री नको होते, ते ज्युनिअर असल्याने विरोध होता असंही शरद पवार म्हणाले होते.
advertisement
अजित दादांना संधी दिली गेली नाही असा आरोप सातत्याने होते. या आरोपाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, २००९ मध्ये आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. कारण तेव्हा आमच्याकडे योग्य नेता नव्हता. तर अजितदादा तेव्हा नवखे होते. छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्षात फूट पडली असती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 19, 2024 3:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदे 2019मध्येच मुख्यमंत्री झाले असते पण...; शरद पवारांच्या मुलाखतीनंतर राऊतांचा मोठा खुलासा


