शरद पवार अजितदादांसोबत जाऊच शकत नाही कारण... संजय राऊत यांना ठाम विश्वास
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
NCp Reunion: अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन, चर्चा करून एकत्रिकरणाचा अंतिम निर्णय घ्यावा, असे दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांना वाटते.
नाशिक : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबतच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून शरद पवार यांच्या मुलाखतीतील निर्देशानुसार पदाधिकाऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकून प्रमुख नेत्यांनी एकत्रीकरणाबाबत पत्रे लिहायला सुरुवात केली आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेऊन, चर्चा करून एकत्रिकरणाचा अंतिम निर्णय घ्यावा, असे दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांना वाटते.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार असून आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्रित येईल, अशी अजिबातही शक्यता दिसत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पवारांसोबत काम करतोय, त्यांच्या भूमिका आम्हालाही कळतात
शरद पवार यांच्या एका मुलाखतीतील ओळींवरून काही लोक सुतावरून स्वर्ग गाठतायेत. आम्ही अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करतोय, त्यामुळे त्यांच्या भूमिका आम्हाला माहिती आहेत.
advertisement
जातीयवादी आणि धर्मांध शक्तींसोबत शरद पवार कदापि जाणार नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
ज्यांनी आमचा आणि पवारांचा पक्ष फोडला, त्यांच्यासोबत शरद पवार कसे जातील?
ज्या विचारांसाठी शरद पवार यांनी उभा आयुष्यभर संघर्ष केला. अनेक वर्षे विरोधी पक्षात राहिले. ते आता महाराष्ट्रद्वेषी शक्तींसोबत जाणार नाही. ज्यांनी त्यांचा आणि आमच्या दोघांचाही पक्ष फोडला, त्या लोकांबरोबर शरद पवार कसे जातील? असा सवाल करीत जे जायचे ते सोडून गेले, जे गेलेत त्यांचे चेहरे बघा, तिकडे ते अजिबात सुखी नाहीत, असे राऊत म्हणाले.
advertisement
महापालिका निवडणुकीत शिवसेना आपली ताकद दाखवून देईल
नाशिकपासून धुळे, मालेगावपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढवेन. सर्व महत्वाच्या महापालिकांत शिवसेना आपली ताकद दाखवून देईल, असे राऊत म्हणाले. चार महिन्यात निवडणुका घ्या, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. प्रत्येक पालिकेची बांधणी, मार्गदर्शन सुरू आहे. नाशिकला मोठे शिबीर झाले, प्रत्येक महापालिकेअंतर्गत असे शिबीर होतील, असेही राऊत म्हणाले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
May 13, 2025 9:54 PM IST