Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या पत्नीला नोकरीची ऑफर, पण जॉब स्विकारणार का?
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
Ashwini Deshmukh offer job Ramesh Aadaskar : बीडच्या मस्साजोगचे सरपंच धनंजय देशमुख यांच्या हत्येला आता दुसरा महिना उलटला आहे. त्यानंतर आता देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना नोकरीची ऑफर आली आहे.
Ashwini Deshmukh offer job Ramesh Aadaskar : सुरेश जाधव, बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दुसरा महिना उलटला आहे. त्यानंतर आता देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना नोकरीची ऑफर आली आहे. रमेश आडस यांनी छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या शिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपिकाची नोकरीची ऑफर दिली आहे.आता ही नोकरी स्विकारायची की नाही? याबाबत देशमुख कुटुंब बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्यात यावी,अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे आता रमेश आडस यांनी छत्रपती शिवाजी विद्यालय आडस या शिक्षण संस्थेत कनिष्ठ लिपिकाची नोकरीची ऑफर दिली आहे. रमेश आडस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या घरी जाऊन अश्विनी देशमुख यांना शिक्षण सस्थेच्या कनिष्ट पदावरील नोकरीवर रूजू होण्सासाठी नियुक्ती पत्र दिले आहे. हे पत्र स्विकारताना संतोष देशमुख यांच्या आई आणि बंधु धनंजय देशमुख त्यांच्यासोबत उपस्थित होता.
advertisement
दरम्यान आता अश्विनी देशमुख ही नोकरीची ऑफर स्विकारणार का? याबाबत अद्याप कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही आहे.पण देशमुख कुटुंबिय एकत्र बसून याबाबत निर्णय घेणार आहे. त्यानंतर नोकरी स्विकारण्याबाबतची माहिती देणार आहेत.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
February 14, 2025 4:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या पत्नीला नोकरीची ऑफर, पण जॉब स्विकारणार का?


