Maharashtra Local Body Election Satara : महायुतीत वादाच्या ठिणग्या, फोडाफोडीच्या राजकारणाने साताऱ्यात वातावरण तापलं!
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Satara Local Body Election : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी महायुतीचे आणि महाविकास आघाडीत चुरस लागली आहे.
विशाल पाटील, प्रतिनिधी, सातारा: राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी महायुतीचे आणि महाविकास आघाडीत चुरस लागली आहे. मात्र, सातारा जिल्ह्यात महायुतीतच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र सुरू आहे. भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एकमेकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते पळवापळवीचे, फोडाफोडीचे राजकारण सुरू झालं आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाची नगरपालिका असलेल्या कराड नगरपालिकेतील शिंदे शिवसेनेचे नगरसेवक भाजप जिल्हाध्यक्षांच्या गळाला लागले आहेत. तर दुसरीकडे अजित दादांच्या राष्ट्रवादीनेही भाजपाचे पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला आहे. शिवसेनेचे नेते आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात भाजप आणि शिवसेना अशी दुरंगीच लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे एकमेकांच्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते फोडण्याचे सत्र येथे दररोज पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडींमुळे महायुतीमध्ये काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. आता साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांचा हा फोडाफोडीच्या प्रकरणानंतर तंबीच दिली आहे
advertisement
शंभूराज देसाई यांच्या म्हणण्यानुसार मला फोडाफोडी करायचं म्हणलं तर काही अवघड नाही. पण आम्ही ते करणार नाही नेमका हा इशारा कोणाला होता याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यात सुरू आहे. तर, दुसरीकडे अतुल भोसले हे सर्व पक्षातील नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करण्यात सध्या गुंतले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार यामधील अनेक पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात प्रवेश देण्यासाठी अतुल भोसले सक्रिय आहेत.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची वाट सर्वजण पाहत आहेत. मात्र आता याच निवडणुका महायुतीतील घटक पक्षांना डोकेदुखीच्या ठरणार आहेत का ? असे चित्र सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहता आणि पक्षातील नेत्यांची वाटचाल पाहता निर्माण झाली आहे.
इतर संबंधित बातमी:
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
November 03, 2025 8:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Local Body Election Satara : महायुतीत वादाच्या ठिणग्या, फोडाफोडीच्या राजकारणाने साताऱ्यात वातावरण तापलं!


