Ajit Pawar : पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, साताऱ्यात अजित पवारांचे वक्तव्य

Last Updated:

Satara : साताऱ्यातील सभेत बोलताना अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक निकालावर मोठं विधान केलंय. पिपाणीमुळे राजा वाचला असं ते म्हणाले.

News18
News18
सातारा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राज्यात उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेत त्यांनी लोकसभा निवडणूक निकालावर मोठं विधान केलं. साताऱ्यात पिपाणीमुळे जागा वाचली. आमचा राजा वाचला असं भाष्य अजित पवार यांनी केलंय.
राष्ट्रवादीत फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना मोठा फटका बसला. अनेक जागांवर उमेदवारांचा पराभव झाला. बारामतीत सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का बसला. यासंदर्भात अजित पवार त्यांच्या भाषणात बोलले. पराभवाने खचून जायचं नसतं आणि यश मिळाल्यावर हुरळून जायचं नसतं. त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर पुन्हा कामाला लागले. आम्हीही विचार केला आणि लोकसभेला कमी का पडलो याचा विचार केला असंही अजित पवार म्हणाले.
advertisement
विरोधकांकडून फेक नरेटिव्ह सेट करण्यात आल्याचा पुनरुच्चार अजित पवार यांनी केला. लोकसभेवेळी पाण्याचा दुर्भिक्ष्य होतं. उन्हाळा होता. आता पाऊस झालाय. धरणं भरली आहेत.विहिरींना चांगलं पाणी आहे. लोकसभेला संविधान बदलणार असं पसरवण्यात आलं. घटना बदलायचीय असा खोटा प्रचार केला गेला आणि तो मागासवर्गीयांना खरा वाटल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.
फेक नरेटिव्हवर बोलताना अजित पवार म्हणाले की, कुठून कुठून कल्पना काढल्या काय माहिती. पण आमची वाटच लावली. बारामतीत, माढ्यात आमची वाट लावली.साताऱ्यात पिपाणीने वाचवलं. लोकांना पिपाणी तुतारीसारखी दिसली. ३५ ते ४० हजार मतं पिपाणीला गेली. आमचा राजा वाचला. १३ वे वंशज वाचले. त्यामुळे आमची थोडीफार इज्जत वाचली.
advertisement
लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे ३२ हजार ७७१ मतांनी जिंकले होते. या मतदारसंघात शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिली होती. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर संजय गाडे हे अपक्ष उमेदवार होते. त्यांचं निवडणूक चिन्ह पिपाणी होतं. त्यांना ३७ हजार ६२ मते मिळाली होती. शशिकांत शिंदेंना मिळणारी मत चिन्हाच्या गोंधळामुळे गाडे यांना मिळाल्याचा दावा शरद पवार यांच्या गटाकडून करण्यात आला होता.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, साताऱ्यात अजित पवारांचे वक्तव्य
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement