फलटण डॉक्टर प्रकरणात कोर्टातून मोठी अपडेट; 25 जूनला महिलेचं आरोपी बदनेशी मोठं भांडण, वकिलांनी सगळं सांगितलं
- Published by:Prachi Amale
- Reported by:VAIBHAV SONAWANE
Last Updated:
रोपी असलेल्या निलंबित पीएसआय गोपाल बदनेला रविवारी सायंकाळी फलटण न्यायालयात हजर केले. त्यानंतर कोर्टाने 30ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सातारा : साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर फरार झालेला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याने शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात सरेंडर केलं आहे. पोलिसांनी त्याला काल रात्रीच अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. बदनेला आज कोर्टात हजर करण्यात आले होते.. दरम्यान आज कोर्टात झालेल्या युक्तिवादात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. आत्महत्येच्या या घटनेत आता रोज नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना आता अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या निलंबित पीएसआय गोपाल बदनेला रविवारी सायंकाळी फलटण न्यायालयात हजर केले. त्यानंतर कोर्टाने 30ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
२५ जूनला का केली होती तक्रार?
advertisement
कोर्टात बदनेची बाजू ॲड. राहुल धायगुडे यांनी मांडली. यावेळी बदनेची बाजूने युक्तिवाद करताना वकिलांनी बदने आणि डॉक्टर महिलेच्या भांडणाचा उल्लेख केला आहे. तसेच बदनेला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचे म्हटले आहे. माझ्या ड्युटीमध्ये आरोपी वैद्यकीय चाचणीसाठी का आणता? असे म्हणत महिला डॉक्टर आणि बदनेमध्ये झाला होता. एवढच नाही तर २५ जूनला दोघांनी एकमेकांविरोधात तक्रारी देखील केल्या होत्या.
advertisement
नेमकं भांडण का झालं?
फलटण पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी नेल्यावर माझ्या ड्युटीमध्ये आरोपी का आणता यावरून डॉक्टर महिलेने बदनेशी वाद घातला होता. त्यावेळी तक्रार देखील केली होती, मात्र त्यावेळी बलात्काराची तक्रार करण्यात आलेली नाही, असे वकिलांनी त्यांच्या युक्तिवादात म्हटले आहे.
दोन दिवसांपासून पोलिसांना गुंगाारा
गेल्या दोन दिवसांपासून तो पोलिसांना गुंगाारा देत होता. त्याच्या शोधासाठी फलटण आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथकं बीड, पुणे, पंढरपूर या ठिकाणी शोध घेत होती. पण काही पोलिसांच्या हाती लागला नाही.गोपाळ बदने फलटणहून पंढरपूरला गेला होता. तिथून तो सोलापूरला गेला. पुढे सोलापूरहून बदने बीडला आपल्या घरी गेला. दरम्यानच्या काळात बदने सोलापूरमधील काही पोलिसांच्या संपर्कात असल्याचं समोर आलंय.
advertisement
बदने कुणा कुणाच्या संपर्कात होता?
पोलिसात हजर न झाल्यास बडतर्फ करण्याची तंबी बदनेला मिळाली होती. नोकरीतून बडतर्फ होण्याच्या भितीनचं बदने फलटण पोलिसांना शरण आल्याचं बोललं जातंय. फरार असताना गोपाळ बदने पंढरपुरात थांबला होता. त्याचा मोबाईल फोनच्या लोकेशनवरून पोलीसांनी आता पंढरपुरातील लॉज आणि हॉटेल्सची झाडाझडती सुरु केली आहे, या काळात गोपाळ बदने कुणा कुणाच्या संपर्कात होता. त्याला फरार होण्यात कुणी मदत केली याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
view commentsLocation :
Satara,Maharashtra
First Published :
October 26, 2025 8:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फलटण डॉक्टर प्रकरणात कोर्टातून मोठी अपडेट; 25 जूनला महिलेचं आरोपी बदनेशी मोठं भांडण, वकिलांनी सगळं सांगितलं


