मृत्यूनंतरही तरुणीसोबत घात, फिंगर लॉक वापरून मोबाइलमधील पुरावे डिलीट? खळबळजनक दावा

Last Updated:

Satara Woman Doctor Death Case: साताऱ्याच्या फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणी मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी खळबळजनक आरोप केला आहे.

News18
News18
Satara Woman Doctor Death Case: साताऱ्याच्या फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. डॉक्टर महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून आयुष्याचा शेवट केला. त्यांनी सुसाईड नोटमध्ये निलंबित पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांची नावं नमूद केले होते. बदणे याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केला. तर बनकर मागील चार महिन्यांपासून मानसिक आणि शारिरीक छळ करत होता, असा आरोप महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केला.
या सगळ्या घडामोडीनंतर आता मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी खळबळजनक आरोप केला आहे. आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही, तर तिची हत्या करण्यात आली. आरोपीने सर्व पुरावे नष्ट करून मग पोलीसांकडे सरेंडर केलं, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. एवढंच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीनं मयत डॉक्टरच्या फिंगर लॉकचा वापर केला, असा खळबळजनक दावाही कुटुंबीयांनी केला.
advertisement

कुटुंबीयांचा नेमका दावा काय?

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी कुटुंबीयांनी आता नवा आणि गंभीर दावा केला आहे. डॉक्टरांनी गळफास घेतल्याची माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी आले. मात्र कुटुंबीय घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला होता.
दरम्यान, मृतदेहाच्या हातावर सुसाईड नोट आढळली असतानाच, कुटुंबीयांनी असा संशय व्यक्त केला आहे की, मृत डॉक्टरचे फिंगर लॉक मोबाईल उघडण्यासाठी वापरण्यात आले आणि त्यातील महत्त्वाचा डाटा, तसेच घटनेसंबंधित पुरावे डिलीट करण्यात आले, असं कुटुंबियांचं म्हणणं आहे.
advertisement
कुटुंबीयांच्या या नव्या दाव्यामुळे डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. तूर्तास दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत. दोघांची कसून चौकशी केली जात आहे. मयत तरुणीसह इतर आरोपींचे देखील सीडीआर काढण्यात आले आहे. मयत तरुणी आणि आरोपीचे एकत्रित लोकेशन्स आढळतात का? याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मृत्यूनंतरही तरुणीसोबत घात, फिंगर लॉक वापरून मोबाइलमधील पुरावे डिलीट? खळबळजनक दावा
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement