मोठी बातमी! भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनानं दुचाकीला उडवलं, एकाचा मृत्यू
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
साताऱ्यामधून मोठी बातमी समोर येत आहे, भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनानं एका दुचाकीला उडवलं.
साताऱ्यामधून मोठी बातमी समोर येत आहे, भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनानं एका दुचाकीला उडवलं.

या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
advertisement

बिदाल जवळील शेरेवाडी परिसरात ही घटना घडली आहे. जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनानं दुचाकीला उडवलं.

advertisement
हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये धडक बसलेल्या दुचाकीचा चक्काचूर झाला आहे, दरम्यान या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये.

advertisement
या अपघातामध्ये गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे, गाडीच्या समोरचा भाग पूर्णपणे डॅमेज झाला आहे.
Location :
Satara,Satara,Maharashtra
First Published :
August 24, 2024 10:31 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
मोठी बातमी! भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनानं दुचाकीला उडवलं, एकाचा मृत्यू