शेतीसोबत पशुपालन, दिवसाला 4 हजारांची कमाई, साताऱ्यातील शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी!
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
पूर्वी देशी जनावरांचे पालन मोठ्या प्रमाणावर व्हायचे. मात्र, आता पशुपालन व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आल्याने संकरित गायींच्या पालनातून दुग्ध व्यवसायाने मोठ्या प्रमाणावर भरारी घेतली आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती या व्यवसायातून शेतकऱ्यांना होत असते. दुधाचे उत्पादन हा पशुपालन व्यवसायातील प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातूनच पशुपालन व्यवसायाचे नियोजन केले जाते.
पूर्वी देशी जनावरांचे पालन मोठ्या प्रमाणावर व्हायचे. मात्र, आता पशुपालन व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान आल्याने संकरित गायींच्या पालनातून दुग्ध व्यवसायाने मोठ्या प्रमाणावर भरारी घेतली आहे. तसेच आताचे शेतकरी बाजारपेठेचा अभ्यास करून त्या पद्धतीने व्यवस्थित नियोजन करुनही या व्यवसायामध्ये स्थिस्थावर झालेले आपल्याला बघायला मिळतात. आज अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जे पशुपालनातून लाखो रुपये उत्पन्न घेत आहेत.
advertisement
श्रावणात करा महादेवाचं कौटुंबिक दर्शन, मुंबईतील ही 5 मंदिरे आहेत प्रसिद्ध, photos
विकास मोहन कदम असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सातारा जिल्ह्यातील मालगाव येथील रहिवासी आहेत. मोहन कदम यांनी 2008 मध्ये दुग्ध व्यवसायात पदार्पण केले. विकास कदम यांनी आधी दूध डेअरी चालवत होते. दूध डेअरी चालू करुन 4 वर्षे झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, स्वतःचा गोठा तयार करावा. यानंतर त्यांनी एका गायीपासून सुरुवात केली. आज त्यांच्याकडे 15 मोठ्या गायी आणि 11 कालवडी, तर 1 खिलार गाय आणि दोन कालवडी आहेत. त्याचबरोबर कोंबड्या, शेळीपालनही ते करत आहेत. असा त्यांचा सर्व जनावरांचा गोठा धरून 40 ते 45 जनावरे त्यांच्या गोठ्यात आहेत.
advertisement
मुलांच्या शिक्षणासाठी शेतीबरोबर जोडधंदा कोणता करायचा म्हणून त्यांनी गायींचा गोठा तयार करून त्यातून दूध उत्पादन करून त्याची विक्री सुरुवात केली. खिशात काही भांडवल नसतानाही त्यांनी स्वतःचा गोठा तयार केला. याचे सर्वोत्तम उदाहरण मालगावचे सुपूत्र विकास कदम हे आहेत.
पुण्यात स्वस्तात मस्त शॉपिंग करायची आहे?, ही आहेत तुमच्यासाठी बेस्ट ठिकाणं, PHOTOS
एका गायीपासून सुरू केलेला दुधाचा व्यवसाय मोठा झाला आहे. ते आज रोजचे 125 लीटर रोजचे दूध विकत आहेत. त्यातून दिवसाला त्यांना 4 हजाराहून अधिक पैसे मिळत आहेत. अशाप्रकारे सरासरी एक लाख रुपये महिन्याला या दुधाच्या व्यवसायातून ते कमवू लागले आहेत. या व्यवसायात त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा हा त्यांना मदत करतो. पहाटे पाच वाजेपासून गुरांची स्वच्छता, चारा, दूध काढणे या सर्व कामांसाठी सुरुवात होते. या सर्वात मोठी मदत त्यांच्या पत्नीची होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
August 09, 2024 1:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
शेतीसोबत पशुपालन, दिवसाला 4 हजारांची कमाई, साताऱ्यातील शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी!