पर्यटकांना घेता येणार देशातील पहिल्या सोलर बोटीचा आनंद, याठिकाणी सुरू होणार 'कोयना क्वीन'
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Shubham Sharad Bodake
Last Updated:
सातारा जिल्ह्यासह राज्यातून आणि देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटकांना एक वेगळी पर्वणी पर्यटकांना मिळणार आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा : भारतातली पहिली सोलर बोट कोयना जलाशयाच्या परिसरामध्ये नौका विहार करत आहे. मेड इन इंडिया असलेली भारतातील पहिली सोलर बोट सातारा जिल्ह्यातील कोयना जलाशयात वापरण्यात येणार आहे. कोयनेच्या गोड्या पाण्यामध्ये ही सोलर बोट चालवण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यासह राज्यातून आणि देशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाच्या माध्यमातून पर्यटकांना एक वेगळी पर्वणी पर्यटकांना मिळणार आहे. पर्यटकांना कोयना जलाशयात फिरण्यासाठी आता सोलर बोटचा वापर करण्यात येणार आहे. या सोलर बोटमुळे प्रदूषण कमी होत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
advertisement
कोयना जलाशयावरील जलपर्यटनासाठी 50 कोटीचा आराखडा करण्यात आला आहे. संपूर्ण इको टुरिझम आराखडा आता 400 कोटींचा झाला आहे. या आराखड्यामुळे या परिसराच्या पर्यटन वृद्धीला चालना मिळत असतानाच स्थानिक लोकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावणार आहे. पर्यटकांसाठी बोट, हाऊस बोट, स्कुबा डायव्हिंग, जेट स्की यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांना बोट, हाऊस बोट चालविण्यासाठी ट्रेनिंग देण्यात येत आहे.
advertisement
मुलांमध्ये दिसत असतील ‘ही’ लक्षणं तर व्हा सावध, असू शकतो या नावाचा गंभीर आजार VIDEO
स्थानिक बोट क्लबसाठी बोट मालकांचा काही स्वनिधी व शासनाकडील काही निधी यातून नवीन सोलर बोट त्यांना घेऊन देण्यात येणार आहेत. अथवा सोलर बोटसाठी लागणारे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही बोटिंग क्लब व्यावसायिकांनी सांगितले.
advertisement
बोटीत आहेत या सुविधा -
मेड इन इंडिया असलेली भारतातील पहिली सोलर बोट सातारा जिल्ह्यात बामनोली येथील बोटिंग क्लब मध्ये वापरण्यात येत आहे. या बोटेवर चार सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. फॉरेनमध्ये वापरण्यात येणाऱ्या बोटीसारख्या फीचर्स ही मेड इन इंडियाच्या बोटीत दिले आहेत. स्टेरिंग विंड, जीपीएस, बॅटरीचा डिस्प्ले, सोलरचा डिस्प्ले, आलिशान कुशन, आपत्कालीन व्यवस्थापन, हटके लुक, रिव्हर्स कॅमेरा, फ्रंट कॅमेरा, लाइट्स, जीपीएस मॅप, साऊंड,अशा अनेक सोयी सुविधा या बोटीत दिल्या आहेत.
advertisement
मेहनतीचं फळ! फक्त 2 लाखांत सुरू केला व्यवसाय, आज वर्षाला तब्बल इतकी कोटींची कमाई
या बोटीच्या बॅटरीचे डिझाईन ग्रामीण भागातील लाईटच्या वेळेनुसार आणि पर्यटकांच्या सोयीनुसार करण्यात आले आहे. ही सोलर पॅनल बोट बॅटरीच्या माध्यमातून चार ते पाच तासाचा प्रवास करू शकते आणि सोलरच्या माध्यमातून सात ते आठ तास ही बोट चालू शकते. डोंगरी भागात तीव्र ऊन असल्याने सोलर पॅनलवर कीबोर्ड लवकर चार्जिंग होते. गोड्या पाण्यावर चालणारी ही बोट संपूर्ण चार्जिंग होण्यास एक ते दीड दिवस लागतो. पण या भागात या बोटीचा वापर कमी होत असल्याने ही बोट तीन ते चार तासात पूर्ण चार्जिंग होते.
advertisement
या बोटीत 20 लोक आरामात बसू शकतात. मात्र, 12ते15 प्रवासी या बोटीतून प्रवास करू शकतात, अशी अट प्रशासनाने ठेवली आहे. ही संपूर्ण बोट ॲल्युमिनियमपासून बनवण्यात आली आहे. ही बोट बनवण्याकरता साधारणत: 16 ते 18 लाख संपूर्ण इंटरिअरसह खर्च आल्याचेही सांगितले आहे.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
April 27, 2024 4:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
पर्यटकांना घेता येणार देशातील पहिल्या सोलर बोटीचा आनंद, याठिकाणी सुरू होणार 'कोयना क्वीन'