कसे होते शिवकालीन चलन? 1200 हून अधिक दूर्मिळ नाण्यांचा संग्रह, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
सातारा येथील प्रसाद बनकर यांच्या संग्रहालयात शिवकालीन 1200 हून अधिक नाण्यांचा संग्रह आहे.
शुभम बोडके, प्रतिनिधी
सातारा: नाणी हे इतिहासाच पट उलगडणारे प्रमुख साधन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील नाण्यांबाबत सर्वांनाच कुतुहल असते. याच दूर्मिळ नाण्यांचा संग्रह साताऱ्यातील वाईचे इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी केला आहे. गेल्या 22 वर्षांपासून त्यांनी हा छंद जोपासला असून त्यांच्याकडे 1200 हून अधिक शिवकालीन नाण्यांचा संग्रह आहे. तसेच शिवकालीन शस्त्रांचा संग्रह आणि संवर्धन त्यांनी केले आहे.
advertisement
शिवकालीन नाण्यांचा संग्रह
छत्रपती शिवरायांचा 1674 साली रायगडावर राज्याभिषेक झाला. त्या दिवशी चलनात दोन प्रकारची नाणी आणली. एक नाणे सोन्याचे आणि दुसरे तांब्याचे होते. होन हे सोन्यापासून बनवले होते तर दुसरे नाणे शिवराई तांब्यापासून बनवले होते. हे चलन रायगडावर बनवले असल्याने त्याला रायगड मिंट डॉटेड बॉर्डर शिवराई याला 1 पैसा शिवराई असे म्हटले जाते. याचे वजन 11 ग्रॅम ते 12 ग्रॅम असे आढळून येते, असे बनकर सांगतात.
advertisement
सोन्याचे चलन होन
शिवरायांनी सोन्याचे चलन देखील सुरू केले होते. त्याचे वजन 2 ग्रॅम 720 मिली ते 2 ग्रॅम 920 मिली एवढे आढळून आले आहे. या नाण्यांच्या एका बाजूला छत्रपती लिहून त्यावर लहान लहान ठिपक्यांची बॉर्डर केलेली असते. तर दुसऱ्या बाजूला 'श्री राजा शिव' असे लिहिलेले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलेले चलन सहज ओळखता येते. अशा प्रकारच्या 400 हून अधिक नाण्यांचा संग्रह प्रसाद बनकर यांनी केला आहे.
advertisement
संग्रहात मराठाकालीन नाणी
बनकर यांच्या संग्रहात शिवकालीन तसेच मराठेकालीन नाणीही आहेत. इसवी सन 1674 ते इसवी सन 1920 सालापर्यंतची नाणी आहेत. छत्रपती शिवरायांनंतर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती रामराजे महाराज यांचे ही चलन छापण्यात आले होते. अशा प्रकारचे असंख्य नाण्यांचा संग्रह इतिहासाचा वारसा जपण्यासाठी बनकर हे गेल्या 22 वर्षांपासून करत आहेत.
advertisement
शस्त्रास्त्रांचा संग्रह
बनकर यांनी नाण्यांसोबतच शस्त्रास्त्रांचा संग्रहही केला आहे. शिवकाळात आणि त्यानंतर युद्धात वापरली जाणारी शस्त्रे त्यांनी संकलीत केली आहेत. त्यांच्या संग्रहात शिवकालीन तलवार, भाले, बरचे, वाघनखे, बीचवा, दांडपट्टे, मराठा तोफ, तलवार, चिलानम, ढाल ब्रिटिशकालीन तलवारी बंदुका आहेत. तसेच 14 आणि 15 व्या शतकातील शस्त्रेही आहेत.
Location :
Satara,Maharashtra
First Published :
January 21, 2024 12:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
कसे होते शिवकालीन चलन? 1200 हून अधिक दूर्मिळ नाण्यांचा संग्रह, Video