Kolhapur: मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Kolhapur Election Satej Patil: एका सत्ताधारी आमदाराने एका कामासाठी तब्बल ४० लाख रुपयांची टक्केवारी (कमिशन) मागितल्याचा खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कोल्हापूर: महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भ्रष्टाचाराच्या आरोपांनी कोल्हापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. शहरातील एका सत्ताधारी आमदाराने एका कामासाठी तब्बल ४० लाख रुपयांची टक्केवारी (कमिशन) मागितल्याचा खळबळजनक व्हिडिओ काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या 'स्टिंग ऑपरेशन' सदृश व्हिडिओमुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी झाली असल्याची चर्चा आहे.
> काय आहे सतेज पाटलांचा आरोप?
सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ आपल्या अधिकृत पेजवरून प्रसिद्ध करत थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे. "एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे शहराचे आमदार ४० लाखांची टक्केवारी मागत आहेत. महापालिकेच्या मतदानापूर्वी जनतेला या भ्रष्टाचाराचे सत्य समजलेच पाहिजे," असे पाटील यांनी म्हटले आहे.
advertisement
> शिंदे गटाच्या आमदारांकडे संशयाची सुई?
हा व्हिडिओ शिंदे गटाच्या आमदाराशी संबंधित असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात या पक्षाचे तीन आमदार असल्याने "तो आमदार नेमका कोण?" असा प्रश्न आता मतदारांमध्ये विचारला जात आहे. "आम्ही कोणाला मतदान करतोय आणि ते कशासाठी, हे कोल्हापूरकरांना कळायला हवे," असे म्हणत पाटील यांनी तिन्ही आमदारांनी यावर खुलासा करण्याची मागणी केली आहे.
advertisement
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सायबर सेलने व्हिडिओची सत्यता तपासावी आणि ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला आहे त्याची खातरजमा करावी, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे. महापालिका निवडणुकीच्या मतदानावर या व्हिडिओचा मोठा परिणाम होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 1:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur: मतदानाच्या दोन दिवस आधी कोल्हापुरात खळबळ! सतेज पाटलांनी फोडला 'टक्केवारी'चा बॉम्ब, महायुतीचा तो आमदार कोण?









