Uddhav Thackeray : 'निवडणुकीत जय श्रीराम, जय श्रीकृष्ण म्हणा, अन्...', उद्धव ठाकरेंचं मतदारांना आवाहन
- Published by:Shreyas
Last Updated:
भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे धर्माच्या विरोधात अर्धम, उठवतील त्यांचा नाश करावा लागेल. धर्माच्या विरोधात जाणाऱ्या भाजपला धडा शिकवणं गरजेचं आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं.
मुंबई, 24 डिसेंबर : कालपर्यंत जे आपले होते ते आज विरोधात आहेत, त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे धर्माच्या विरोधात अर्धम, उठवतील त्यांचा नाश करावा लागेल. धर्माच्या विरोधात जाणाऱ्या भाजपला धडा शिकवणं गरजेचं आहे, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मीरा-भाईंदरमध्ये गोवर्धन पूजा समारोहाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली, त्यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं.
'तुम्ही आम्हाला मत दिलंत तर तुम्हाला रामलल्लाचं दर्शन मोफत करून देऊ, असं म्हणाले. रामलल्ला तुमची प्रॉपर्टी आहे का? किती वर्षांपासून जय श्रीकृष्ण, जय श्रीराम हे कित्येक वर्षांपासून चालत आलंय. तुम्ही आता आलात आणि तुम्हाला असं वाटतंय की जय श्रीराम आणि बजरंग बली की जय म्हणलं तर सगळे हिंदू आपल्यासोबत येतील. हाच त्यांचं हिंदुत्व आणि शिवसेनेच्या हिंदुत्वातला फरक आहे. हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे,' असं उद्धव ठाकरे म्हणाले.
advertisement
'8-10 दिवसांपूर्वी पंतप्रधान गुजरातला गेले होते, मुंबईहून सगळे उद्योग गुजरातला नेत आहेत. आमच्यासोबत जे गुजराती राहत आहेत, ते पुन्हा सुरतला जातील? गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, का महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का? उत्तर प्रदेश मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का?' असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
advertisement
'हिंदुत्वाचा आधार घेऊन हिंदूंविरोधात तानाशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान म्हणतात तसं मी तुम्हाला सांगतो, निवडणूक आली की जय श्रीराम, जय श्रीकृष्ण म्हणा आणि तानाशाही संपवा,' असं आवाहन उद्धव ठाकरेंनी जनतेला केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 25, 2023 12:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : 'निवडणुकीत जय श्रीराम, जय श्रीकृष्ण म्हणा, अन्...', उद्धव ठाकरेंचं मतदारांना आवाहन