advertisement

८ दिवसांपूर्वी घेतली होती नवी कार; चहाच्या एका तलफेने कसा हिरावला ४ मित्रांचा जीव? थरार वाचून डोळे पाणावतील

Last Updated:

अकोला महामार्गावर चहासाठी निघालेल्या सात मित्रांच्या कारला अज्ञात वाहनाची धडक, कार तीनदा पलटली, चौघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी, परिसरात हळहळ

चहामुळे चार मित्रांनी गमावला जीव
चहामुळे चार मित्रांनी गमावला जीव
मैत्रीच्या नात्यातला सगळ्या महत्त्वाचा दुवा म्हणजे चहा, अगदी भांडण सोडवण्यापासून ते एकमेकांना गोष्टी शेअर करण्यापर्यंत एकदी छोटे मोठे सेलिब्रेशनपण चहाच्या टपरीवरच व्हायचे. मग काय चहाची तलफ आली आणि ठरला प्लॅन. मेसेज फोन झाले आणि एकाने कार काढली एकाने बाइक काढली. सवारी चहाला निघाली, सात मित्र एकमद गप्पा मज्जा करत चहाच्या टपरीकडे निघाले आणि अचानक अज्ञान वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला.
मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (23), मोहम्मद अनस मोहम्मद सईद (22), अब्दुल अवेज मोहम्मद अकील (23) आणि मोहम्मद अनवेज अब्दुल सलीम (23) अशी मृतांची नावे आहेत. तर मोहम्मद हुजेफा (22), मोहम्मद अशर (21) आणि मोहम्मद अनस (24) हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एक चहासाठी निघालेल्या सात मित्रांसोबत घात झाला. आठ दिवसांपूर्वी मोहम्मद आशर इरशाद अहमद याने नवी कोरी घेतली होती. नवीन गाडीचा आनंद मित्रांसोबत शेअर करण्यासाठी रात्रीचा चहाचा प्लॅन ठरवला. सातही मित्र अकोला महामार्गावरील नाक्याकडे निघाले होते. मात्र काळाने वाटेतच घाला घातला. तीन मित्रांनी डोळ्यासमोर आपल्या चार मित्रांना तडफडून जीव सोडताना पाहिलं. तर तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
मोहम्मद आशर इरशाद अहमद सुदैवानं कार अपघातात बचावला मात्र तो जखमी झाला आहे. जुनी वस्तीतील जुन्या कब्रस्तान परिसरात मृत चार मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अब्दुल सलीम हा डी फार्मचे शिक्षण घेत होता. मोहम्मद तलहा आणि मोहम्मद अवेज, मोहम्मद अनस हे तिघेही उच्च शिक्षण घेत होते. या चौघांची कौटुंबिक स्थिती म्हणावी तशी फार चांगली नव्हती. घरचा मोठा आधार हरपल्याची भावाना कुटुंबियांनी व्यक्त केली.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनाने कारला जोराची धडक दिली आणि कार तीनदा पलटली. यामध्ये चौघांचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणात हसत्या खेळत्या चार मित्रांचा प्रवास कायमचा थांबला. मागे फक्त आठवणी राहिला. अंगावर काटा आणणारा हा भीषण अपघात होता. गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. चार मित्रांसोबत पुन्हा कधीच चहा घेता येणार नाही. चहा बघितल्यानंतर नेहमी त्यांची आठवण येत राहील अशी जखमी तीन मित्रांची भावना आहे. जीवभावाचे मित्र कायमचे दुरावले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
८ दिवसांपूर्वी घेतली होती नवी कार; चहाच्या एका तलफेने कसा हिरावला ४ मित्रांचा जीव? थरार वाचून डोळे पाणावतील
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement