HDFC बँक सर्वांना माहितीये, पण याचा फूल फॉर्म काय? 90% लोकं होतील फेल
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
भारतातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसी बँक ही खुप प्रसिद्ध आहेत. अनेक लोकांचे यामध्ये अकाउंट आहेत. पण या HDFC चा फूल फॉर्म काय? हे अनेकांना माहितीच नाही.
भारतातील लाखो लोकांचं बँक अकाउंट हे एचडीएफसी बँकेत आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी आणि मजबूत बँकिंग सिस्टमची गरज लक्षात घेऊ एचडीएफसी बँकेची सुरवात झाली. पण या HDFC चा फूल फॉर्म अनेकांना अजुनही माहिती नाही. सुरुवातीला ही बँक नव्हती. ज्यावेळी देशातील सामान्य लोकांसाठी घर बांधणे एक स्वप्न होतं. तेव्हा त्यांची आर्थिक मदत करण्यासाठी 1977 मध्ये या संस्थेची स्थापना झाली. यानंतर 1994 मध्ये या संस्थेने बँकिंग सेक्टरमध्ये पाऊल ठेवलं आणि आज ही देशातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक बनली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मोठ्या संस्थेची सुरुवात हसमुखभाई पारेख (एच.टी.पारेश) यांनी केली.
advertisement
मुंबईच्या वरळी परिसरातील लहान भवन 'सँडोज हाउस' मध्ये एचडीएफची बँकेचं पहिलं कार्यालय सुरू करण्यात आलं होतं.त्या काळात प्रायव्हेट बँकांना लायसेंस मिळणं कठीण होतं. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पहिल्यांदा लायसेंस मिळवणाऱ्या बँकेत ही बँकही सामिल होती. आज या बँकेच्या 8 हजार पेक्षा जास्त शाखा आहेत. या बँके लाखो कर्मचारी काम करतात.
advertisement
advertisement
advertisement
पूर्वी एचडीएफसी लिमिटेड ही होम लोन देत होती. तर एचडीएफसी बँक ही बँकिंग सुविधा देत होती. या दोन्ही वेगवेगळ्या कंपन्या होत्या. या दोन्ही मिळून 1 जुलै 2023 रोजी या बँका विलिन होऊन एकाच छताखाली आल्या. 40 बिलियन डॉलरच्या या मर्जरची जगभरात चर्चा झाली. आता ग्राहकांना होम लोन, इंशुरन्स, म्युच्युअल फंड्स आणि सेव्हिंग्स अकाउंट सर्वच सुविधा एका ठिकाणी मिळताय.









