Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉल क्लिनिकडून मेडिकल बुलेटिन जारी, आता कशी आहे तब्येत?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Sharad Pawar Health Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकने अधिकृत मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. पवारांची तब्येत आता स्थिर असून त्यांनी हलका आहार घेण्यासही सुरुवात केली आहे.
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकने अधिकृत पत्रक (Official Statement) प्रसिद्ध केले आहे. पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. रविवारी, शरद पवार यांना पु्न्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच डिस्चार्ज दिल्यानंतर रविवारी पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेंचं वातावरण होतं.
तोंडी आहार सुरू, प्रकृती स्थिर
रुबी हॉल क्लिनिकचे चेअरमन आणि मुख्य हृदयविकार तज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहे. त्यांनी आता तोंडी द्रवपदार्थ (Oral fluids) आणि हलका आहार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या शरीरातील सर्व महत्त्वाचे घटक (Vital Parameters) सध्या सामान्य मर्यादेत आहेत.
advertisement
आणखी दोन दिवस निरीक्षणाखाली
पवारांची प्रकृती सुधारत असली तरी, त्यांना पूर्ण विश्रांती मिळावी आणि प्रकृतीची पूर्ण खात्री करून घेता यावी, यासाठी त्यांना आणखी दोन दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यांना सध्या आवश्यक असलेले सपोर्टिव्ह केअर (Supportive care) उपचार दिले जात असल्याची माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आली. दोन दिवसानंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.
advertisement
शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. आता रुग्णालयाने दिलेल्या या सकारात्मक माहितीमुळे कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 3:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट! रुबी हॉल क्लिनिकडून मेडिकल बुलेटिन जारी, आता कशी आहे तब्येत?










