शरद पवारांचा मोठा नेता वर्षा बंगल्यावर, शिंदेंसोबतच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षावर दाखल झाले आहे. ही भेट नेमकी जितेंद्र आव्हाड कोणत्या कारणासाठी घेतायत. याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे.
Jitendra Awhad meet Eknath Shinde : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहे. ही भेट नेमकी जितेंद्र आव्हाड कोणत्या कारणासाठी घेतायत, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे.त्यामुळे भेटीमागचं कारण गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
खरं तर महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजुने कौल दिला आहे. हा निकाल लागून आठवडा उलटला आहे. मात्र महायुतीत मुख्यमंत्रीपदाच्या रस्सीखेच सूरूच आहे. यावर तोडगा काढण्यासाठी गुरूवारी अमित शाहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत एकनाथ शिंदे,अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यावर चर्चा झाली. मात्र या चर्चेनंतर केद्रातीत दोन नेते महाराष्ट्रात येऊन दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करणार आहे.
advertisement
दरम्यान या सर्व सत्ता स्थापनेच्या घडामोडीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनात शिंदे नाराज असल्याचीही चर्चा आहे. कारण गुरूवारच्या दिल्लीतल्या बैठकीनंतर जे फोटो समोर आले, त्या फोटोच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे हसरे चेहरे दिसले होते, तर एकनाथ शिंदे यांचा चेहरा पडला होता.त्याच्या चेहऱ्याचे हावभाव नाराज असल्याचे भासवत होते. त्यामुळे या नाराजीनंतर ही भेट अनेकांच्या भूवय्या उंचावणारी आहे.
advertisement
जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ आता बच्चू कडू देखील वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.त्यामुळे वर्षा बंगल्यावर नेमक्या काय घडामोडी घडतायत याकडे आता महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत आता काय चर्चा होते? याचा तपशील आता बैठकीनंतर समोर येणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 29, 2024 2:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद पवारांचा मोठा नेता वर्षा बंगल्यावर, शिंदेंसोबतच्या भेटीमागचं कारण गुलदस्त्यात


