advertisement

पार्थ-रोहित पवारांची भेट, सुनेत्रा पवारांचा शपथविधी अन् विलिनीकरण..,शरद पवारांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

Last Updated:

Sharad Pawar : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान २८ जानेवारीला अपघातामध्ये निधन झालं.त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं.

sharad pawar
sharad pawar
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान २८ जानेवारीला अपघातामध्ये निधन झालं.त्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळालं. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अशातच आता दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या.मात्र, या मुद्द्यावरून मत मतांतरे पाहायला मिळत आहेत. अशातच आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत यावर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे.
शरद पवार फडणवीसांवर काय म्हणाले?
शरद पवार यांना पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर केलेल्या भाष्यावर प्रश्न विचारण्यात आला.यावर शरद पवार म्हणाले की, ''मुख्यमंत्री फडणवीस हे या चर्चेत सहभागी नव्हते. त्यामुळे त्यांना विलनीकरणावर भाष्य करण्याचा अधिकार नाही''.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, अजित पवार यांच्या निधनापूर्वी सुमारे एक तास त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली होती. त्या चर्चेदरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणताही उल्लेख केला नव्हता, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
advertisement
फडणवीस यांनी पुढे म्हटले होते की, जर अजित पवार खरोखरच पक्षाच्या एकत्रीकरणाबाबत विचार करत असतील, तर भाजपशी संवाद न साधता त्यांनी असा मोठा निर्णय घेतला असता का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करायचे की नाही? हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी सत्तेत सहभागी असलेल्या प्रमुख पक्षांशी चर्चा करणे आवश्यक असते, असेही त्यांनी नमूद केले होते. तसेच, अजित पवार यांनी यापूर्वीही विविध राजकीय घडामोडींमध्ये भाजपशी संवाद साधला होता. त्यामुळे भविष्यात अशा कोणत्याही मोठ्या निर्णयासाठी संबंधित पक्षांमध्ये चर्चा होणे अपरिहार्य आहे, असे मतही फडणवीस यांनी व्यक्त केले होते.
advertisement
अजित पवारांच्या स्मारकावर काय म्हणाले?
पवार म्हणाले की, ''मला काही जास्त याबाबत माहिती नाही स्मारक बाबत कोणी सागितले मी वाचले मला माहिती नाही.या संस्था जागेबाबत चर्चा झाली नाही. एकत्रित बसून निर्णय घेऊ अजून चर्चा झाली नाही.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या याचा आनंद
शरद पवार म्हणाले की, ''उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना संधी दिली. याबाबत मला आनंद आहे. शपथ विधीबाबत मला कुठलीही कल्पना नव्हती. असंही पवार म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पार्थ-रोहित पवारांची भेट, सुनेत्रा पवारांचा शपथविधी अन् विलिनीकरण..,शरद पवारांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement