Malegaon Mahapalika Mayor: मालेगावात शिवसेना एकटी पडली, इस्लाम पार्टीने दिला दणका, महापौरपदी नसरीन बानो विजयी
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Malegaon Mahapalika Mayor: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
बब्बू शेख, प्रतिनिधी मालेगाव: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार लता घोडके यांचा २५ मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत भाजप आणि एमआयएम (MIM) या दोन्ही पक्षांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. ज्याचा फटका शिंदे गटाला बसल्याचं सांगण्यात येत आहे.
८४ सदस्यसंख्या असलेल्या मालेगाव महापालिकेत महापौर पदासाठी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो आणि शिंदे गटाच्या लता घोडके यांच्यात थेट लढत पार पडली. यात नसरीन बानो यांना एकूण ४३ मतं मिळाली. तर घोडके यांना केवळ १८ मतांवर समाधान मानावं लागलं. त्यांचा २५ मतांनी पराभव झाला. नसरीन बानो यांना इस्लाम पार्टीच्या 35, समाजवादी पार्टीच्या 5 आणि काँग्रेसच्या 3 अशा एकूण 43 नगरसेवकांनी मतदान केलं.
advertisement
दुसरीकडे, शिवसेनेकडे १८ नगरसेवकांचे संख्याबळ होते. शिवसेनेने लता घोडके यांना रिंगणात उतरवले होते, मात्र त्यांना केवळ आपल्या हक्काच्या १८ नगरसेवकांचीच मते मिळवता आली. या निवडणुकीत सर्वात मोठी चर्चा एमआयएम आणि भाजपच्या भूमिकेची होती. २१ नगरसेवक असलेल्या एमआयएमने कोणाला पाठिंबा दिला असता, तर निवडणुकीचे चित्र बदलू शकले असते. मात्र, एमआयएमच्या २१ आणि भाजपच्या २ नगरसेवकांनी निवडणुकीत तटस्थ राहणे पसंत केले. यामुळे इस्लाम पार्टीच्या उमेदवाराचा मार्ग अधिक सुकर झाला.
advertisement
महापौर पदासाठी एकूण तीन उमेदवारांनी ५ नामनिर्देशन पत्रे दाखल केली होती. मात्र, प्रत्यक्ष लढत ही शेख नसरीन बानो आणि लता घोडके यांच्यातच पाहायला मिळाली. विजयाची अधिकृत घोषणा होताच महापालिका सभागृहात सेक्युलर फ्रंटच्या नगरसेवकांनी गुलालाची उधळण करत आणि घोषणाबाजी करत मोठा जल्लोष केला.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 12:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Malegaon Mahapalika Mayor: मालेगावात शिवसेना एकटी पडली, इस्लाम पार्टीने दिला दणका, महापौरपदी नसरीन बानो विजयी







